TRENDING:

'या' पाच सवयी अंगिकारा, शरीरातील खराब कोलेस्टेरॉलपासून सुटका मिळवा

Last Updated:

खराब कोलेस्टेरॉल रक्तवाहिन्यांमध्ये जमा झाल्यास रक्त योग्यरित्या वाहणं कठीण होतं. अशावेळी हात-पाय दुखणं, स्ट्रोक किंवा हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता असते.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : निरोगी जीवनासाठी, प्रत्येकाने आरोग्याची काळजी घेणं आवश्यक आहे. आरोग्य चांगलं राहावं, यासाठी शरीरातील कोलेस्टेरॉल योग्य प्रमाणात राहणं आवश्यक आहे. पण तुमच्या शरीरातील कोलेस्टेरॉलचं प्रमाण योग्य राहावं, यासाठी तुम्ही तुमच्या काही सवयी बदलणं फायद्याचं ठरू शकतं. शरीराला योग्य प्रमाणात कोलेस्टेरॉलची आवश्यकता असते. कोलेस्टेरॉल हा शरीरामधला असा घटक आहे, जो मेणासारखा असतो. ते शरीराच्या प्रत्येक पेशीमध्ये आढळते. परंतु शरीरातील कोलेस्टेरॉल जास्त प्रमाणात वाढू लागते, तेव्हा आरोग्याशी संबंधित विविध समस्या उद्भवू लागतात.
News18
News18
advertisement

खराब कोलेस्टेरॉल रक्तवाहिन्यांमध्ये जमा झाल्यास रक्त योग्यरित्या वाहणं कठीण होतं. अशावेळी हात-पाय दुखणं, स्ट्रोक किंवा हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता असते. पण रोजच्या काही सवयी, जीवनशैलीतील बदल आणि आहारातील सुधारणा हे खराब कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी उपयुक्त ठरतात. चला तर, शरीरात जमा झालेलं खराब कोलेस्टेरॉल कसं कमी करता येईल, जाणून घेऊ.

नियमित व्यायाम करा

advertisement

रोज सकाळी थोडा व्यायाम केल्यास कोलेस्टेरॉल कमी होतं. दररोज अर्धा तास व्यायाम किंवा सायकलिंग, चालणं याचाही चांगला फायदा होतो. यामुळे रक्तात साठलेलं खराब कोलेस्टेरॉल कमी होण्यास मदत होते.

योग्य नाश्ता

दररोज नाश्त्यात अशा पदार्थांचा समावेश करा जेणेकरून शरीरातील कोलेस्टेरॉल मॅनेज करण्यास मदत होईल. कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी धान्य, फळं, भाज्या आणि ताज्या पदार्थांचानाश्त्यात समावेश केला जाऊ शकतो. फायबरयुक्त नाश्ता कोलेस्टेरॉल कमी करण्यास मदत करतो.

advertisement

प्रोसेस्ड फूड टाळा

व्यस्त जीवनशैलीमुळे आपण अनेकदा ताज्या अन्नाऐवजी पॅकिंग फूड आहारात समाविष्ट करतो. यामुळे कोलेस्टेरॉल वाढू शकते. विशेषत: पॅकेट स्नॅक्स, फास्ट फूड्स आणि शुगरयुक्त पेयांचा आहारात समावेश करू नका.

ग्रीन टी प्या

सकाळी ग्रीन टी प्या. ग्रीन टीमध्ये अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात, व त्यात शरीरातील खराब कोलेस्टेरॉल कमी करणारे घटक असतात. एक कप ग्रीन टी शरीराला अनेक फायदे देतो. यामुळे चयापचय वाढते आणि वजन कमी होण्यासही मदत होते.

advertisement

कोमट पाणी प्या

तुम्ही तुमच्या दिवसाची सुरुवात कोमट पाणी पिऊन करा. सकाळी कोमट पाण्यात लिंबाचा रस मिसळून प्यायल्यास पचनक्रिया चांगली होते, आणि कोलेस्टेरॉल कमी होण्यासही मदत होते. लिंबामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते, जे शरीरातील कोलेस्टेरॉल कमी करण्यास मदत करते.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शेतकऱ्यांसाठी चिंताजनक बातमी, सोयाबीनच्या दरात मोठी घट, कापसाला काय मिळाला भाव?
सर्व पहा

दरम्यान निरोगी आरोग्य साठी शरीरातील कोलेस्टेरॉल प्रमाण योग्य ठेवण्यासाठी प्रयत्न करणे खूप महत्त्वाचे आहे.

advertisement

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
'या' पाच सवयी अंगिकारा, शरीरातील खराब कोलेस्टेरॉलपासून सुटका मिळवा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल