उभं राहून पाणी पिण्याचे दुष्परिणाम
कोडरमा येथील सदर हॉस्पिटलमधील जिल्हा आयुष वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रभात कुमार यांच्या मते, उभं राहून पाणी प्यायल्याने अनेक गंभीर समस्या उद्भवू शकतात.
- उभं राहून पाणी प्यायल्याने ते वेगाने शरीराच्या खालच्या भागात पोहोचते.
- यामुळे शरीरातील सांध्यांमध्ये पाणी साचते, ज्यामुळे संधिवात आणि सांधेदुखी होण्याचा धोका वाढतो.
- तसेच, पचनसंस्थेवर परिणाम होतो आणि किडनी तसेच मूत्रमार्गाशी संबंधित आजार होण्याची शक्यता असते.
advertisement
दूध कसे प्यावे?
डॉ. प्रभात कुमार यांच्या मते, आयुर्वेदात दूध उभं राहून पिण्याचा सल्ला दिला जातो.
- उभं राहून दूध प्यायल्याने ते थेट शरीरातील प्रत्येक भागापर्यंत पोहोचते आणि पोषण मिळते.
- पाणी मात्र नेहमी बसून आणि घोटघोट करून प्यावे, जेणेकरून शरीराला ते व्यवस्थित शोषून घेता येईल.
- तसेच, पाणी पिताना पाय फोल्ड करून टाचांवर बसून प्यायल्यास शरीराला अधिक फायदेशीर ठरते.
advertisement
आयुर्वेदानुसार, पाणी बसून प्यावे आणि दूध उभं राहून प्यावे. चुकीच्या पद्धतीने पाणी प्यायल्याने संधिवात, पचनाच्या समस्या आणि किडनीचे विकार होऊ शकतात. योग्य पद्धतीने पाणी आणि दूध घेतल्याने शरीर निरोगी राहते आणि आजार दूर राहतात.
हे ही वाचा : रोज ही 3-4 पाने चावून खा, आरोग्य राहील एकदम ठणठणीत! शुगरपासून कोलेस्ट्राॅलपर्यंत सर्व त्रास होतील कमी
advertisement
हे ही वाचा : Bloating : पोट फुगण्याच्या समस्येवर सोपा उपाय, पचन होईल सोपं, हे उपाय नक्की करुन पाहा
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 05, 2025 12:10 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
तुम्ही कसं पाणी पिता, उभं राहून की बसून? चुकीची पद्धत्तीने होऊ शकतात गंभीर आजार, तज्ज्ञांनी सांगितली ही योग्य पद्धत्त!
