Bloating : पोट फुगण्याच्या समस्येवर सोपा उपाय, पचन होईल सोपं, हे उपाय नक्की करुन पाहा
- Published by:Renuka Joshi
Last Updated:
ओवा, बडिशेप, वेलची यासारख्या नैसर्गिक बियांचं सेवन केल्यानं पचनक्रिया सुधारतेच पण पोटात गॅस आणि जडपणा यासारख्या समस्यांपासूनही आराम मिळतो.
मुंबई : जेवण झालं की पोट भरतं पण पोटात जडपणा जाणवतो. काही वेळा पोट फुगल्यासारखं वाटतं आणि दुखतं. या पोट दुखण्याच्या समस्येवर काही घरगुती उपाय करुन बघता येतील. यामुळे पोट फुगण्याची समस्या नैसर्गिकरित्या बरी होईल. ओवा, बडिशेप, वेलची यासारख्या नैसर्गिक बियांचं सेवन केल्यानं पचनक्रिया सुधारतेच पण पोटात गॅस आणि जडपणा यासारख्या समस्यांपासूनही आराम मिळतो.
बडीशेप, वेलची, जिरे, धणे यांसारख्या बिया उपयुक्त आहेतच शिवाय हा सोपा आणि सुरक्षित पर्याय आहे. अनेक वेळा तळलेलं अन्न खाल्लं किंवा जास्त प्रमाणात खाल्ल्यानं पोट फुगण्याची समस्या सुरू होते. जेव्हा पोट तुडुंब भरलेलं असतं तेव्हा अस्वस्थ वाटतं. अशावेळी, पोटदुखीही सुरू होते. पोटाच्या या समस्येवर सोपे आणि नैसर्गिक उपाय पाहूयात.
advertisement
बडीशेप
बडीशेप पचनसंस्थेसाठी खूप फायदेशीर आहे. त्यामुळे गॅस आणि ब्लोटिंगची समस्या दूर होण्यास मदत होते. जेवणानंतर अर्धा चमचा बडीशेप चावून खावी. यामुळे पोटाची जळजळ शांत होते आणि पचन सुधारतं. बडीशेपेमुळे श्वासाची दुर्गंधी देखील दूर होते.
advertisement
ओवा
ओव्यामध्ये असलेले थायमॉल गॅस्ट्रिक ज्यूसचा स्राव वाढवते, ज्यामुळे अन्नाचं सहज पचन होतं. पोटातला जडपणा आणि ऍसिडिटीपासून यामुळे आराम मिळतो. ओव्यामध्ये थोडंसं काळं मीठ मिसळून ते चावून घ्या. हे रिकाम्या पोटी किंवा जेवणानंतर खा.
मेथीचे दाणे
मेथीच्या दाण्यांमध्ये भरपूर फायबर असतं, यामुळे पचनसंस्था स्वच्छ राहण्यास मदत डहोते. पोटातला जडपणा आणि बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो. सकाळी रात्रभर पाण्यात भिजवलेले मेथीचे दाणे चघळावे किंवा त्याचं पाणी प्यावं.
advertisement
धणे
धण्यामध्ये अँटिऑक्सिडेंट आणि दाहक-विरोधी गुणधर्म असतात, यामुळे पचन सुलभ होतं आणि जळजळ कमी होते. कोथिंबीर गरम पाण्यात उकळून किंवा बिया चावून त्याचा डेकोक्शन बनवा. याच्या सेवनामुळे पोट थंड राहतं आणि जडपणा कमी होतो.
जिरं
पोटातील गॅस, पोट फुगणं आणि जडपणा यासारख्या समस्यांवर जिरं हा नैसर्गिक उपचार आहे. यामध्ये असलेल्या घटकांमुळे पचन सुलभ होतं. जेवणानंतर अर्धा चमचा जिरं चघळावं किंवा पाण्यात उकळून प्यावं.
advertisement
वेलची
छातीत जळजळ, गॅस आणि सूज कमी करण्यासाठी वेलची अत्यंत प्रभावी आहे. वेलचीच्या सुगंधामुळे फ्रेश वाटतं आणि पचनासही मदत होते. एक किंवा दोन वेलची चावून खावी किंवा चहामध्ये घालून प्या.
या व्यतिरिक्त काही महत्त्वाचे मुद्दे लक्षात ठेवा
अन्न हळूहळू चावून खा.
तळलेले आणि मसालेदार अन्न टाळा.
पुरेशा प्रमाणात पाणी प्या.
advertisement
दिवसातून किमान 15-20 मिनिटं चालण्याची सवय ठेवा.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
February 04, 2025 7:26 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Bloating : पोट फुगण्याच्या समस्येवर सोपा उपाय, पचन होईल सोपं, हे उपाय नक्की करुन पाहा


