advertisement

'लव्ह ट्रँगल'नं मुंबई हादरली! एका बॉयफ्रेंडसाठी दोघींचं बिनसलं, तब्बसूमनं शिखाला संपवलं

Last Updated:

Mumbai News: काही दिवसांपूर्वी नदीमचा शिफा शेख हिच्याशी संपर्क वाढल्याची माहिती तब्बसूमला मिळाली. तब्बसूमने थेट तिचा घर गाठलं.

mumbai news एका बॉयफ्रेंडसाठी दोघींचं बिनसलं, तब्बसूमनं शिखाला संपवलं, लव्ह ट्रँगलनं मुंबई हादरली!
mumbai news एका बॉयफ्रेंडसाठी दोघींचं बिनसलं, तब्बसूमनं शिखाला संपवलं, लव्ह ट्रँगलनं मुंबई हादरली!
मुंबई: प्रेमसंबंधातील वादातून एका तरुणीची गोळी झाडून हत्या केल्याची धक्कादायक घटना गोवंडी परिसरात उघडकीस आली आहे. प्रेमात अडसर ठरत असल्याच्या रागातून तब्बसूम मोहम्मद शेख (25) हिने शिफा शेख हिच्यावर गोळी झाडून तिची हत्या केल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. या घटनेनंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी मुख्य आरोपी तब्बसूम शेखसह तिचा प्रियकर नदीम ऊर्फ रिजवान शेख (27), भाऊ साजीद मोहम्मद शेख (21) आणि कलाम चौधरी या चौघांना अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तब्बसूम आणि नदीम यांचे गेल्या पाच ते सात वर्षांपासून प्रेमसंबंध होते. नदीम हा पूर्वीपासून गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला आरोपी असून तो बराच काळ तब्बसूमच्या घरीच राहत होता. दरम्यान काही दिवसांपूर्वी नदीमचा शिफा शेख हिच्याशी संपर्क वाढल्याची माहिती तब्बसूमला मिळाली. ही बाब कळताच तब्बसूमने शिफाच्या घरी जाऊन तिला नदीमपासून दूर राहण्याचा इशारा दिला होता. अन्यथा गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी धमकीही दिल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे.
advertisement
या घटनेनंतर शिफाच्या कुटुंबीयांना परिस्थितीची कल्पना आल्यानंतर त्यांनी सुमारे तीन महिन्यांपूर्वी तिला गावी पाठवले होते. मात्र काही दिवसांनी शिफा पुन्हा गोवंडीतील कमलारामणनगर परिसरात राहण्यासाठी आली होती. घटनेच्या दिवशी दुपारच्या सुमारास नदीम तब्बसूमच्या घरी असल्याची माहिती शिफाला मिळाली. त्यानंतर ती तेथे गेली असता तब्बसूम आणि शिफा यांच्यात जोरदार वाद झाला.
advertisement
या वादातून संतापाच्या भरात तब्बसूमने नदीमच्या देशी बनावटीच्या कट्ट्याने शिफावर गोळी झाडली. गोळी लागल्याने शिफाचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर तब्बसूमने नदीम, तिचा भाऊ साजीद आणि कलाम यांच्या मदतीने मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला, असेही तपासात उघड झाले आहे.
घटनेची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत चौघांनाही अटक केली. न्यायालयाने आरोपींना 18 फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली असून पुढील तपास सुरू आहे.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
'लव्ह ट्रँगल'नं मुंबई हादरली! एका बॉयफ्रेंडसाठी दोघींचं बिनसलं, तब्बसूमनं शिखाला संपवलं
Next Article
advertisement
Gold News: बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले; शेतकरी एका झटक्यात झाला मालामाल
बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले
  • अजब नशिबाची गजब गोष्ट

  • बदकाने अंडी नाही तर चक्क 'सोनं' दिलं

  • पाहा काय आहे नेमका प्रकार

View All
advertisement