आपल्या शरीराचं कार्य नीट राहावं यासाठी रक्तात कोलेस्टेरॉल असणं आवश्यक असतं. मात्र त्याचे प्रमाण मर्यादित असायला हवं. कोलेस्टेरॉलचं रक्तातील प्रमाण वाढू लागलं की, तुमच्या हार्टवर त्याचे नकारात्मक परिणाम होतात. कोलेस्टेरॉल एकप्रकारचे फॅट आहे जे वाढल्याने शरीरात अनेक समस्या उद्भवतात. बॅड कोलेस्टेरॉल वाढल्याने हार्ट ॲटॅक, स्ट्रोक, टाईप 2 डायबेटिस या आजारांचा धोका वाढतो. तुम्ही आहाराकडे लक्ष न दिल्यास कोलेस्टेरॉल वाढतं.
advertisement
गोड पदार्थ
गोड खाणं अनेक लोकांना आवडतं. काही लोक खूप जास्त प्रमाणात गोड पदार्थांचं सेवन करतात मात्र यामुळे तुमच्या आरोग्याला खूप नुकसान पोहोचू शकतं. अतिगोड पदार्थांच्या सेवनाने आरोग्य बिघडतं. साखरेचं प्रमाण जास्त असलेले पदार्थ खाल्ल्याने नसांमधील बॅड कोलेस्टेरॉल वाढू लागतं, परिणामी तुम्हाला नंतर अनेक आजार होतात. तुम्ही रोज केक, बिस्किट, शेक, मिठाई या पदार्थांचं सेवन करत असाल तर वेळीच सावध व्हा आणि या सवयी बदला.
प्रोसेस्ड फूड वाढवतं कोलेस्टेरॉल
बाजारात मिळणारं पाकिटबंद प्रोसेस्ड फूड तुमच्या आरोग्यासाठी अजिबात चांगलं नाही. आपण सर्रास प्रोसेस्ड फूड खातो, मात्र त्यामुळे आरोग्य बिघडतं. पाकिटबंद फूड लवकर खराब होऊ नये, जास्त काळ टिकावं यासाठी त्यावर प्रोसेस केली जाते. यामध्ये ट्रान्स फॅट व सोडियमचं प्रमाण खूप जास्त असतं. त्यामुळे ब्लड प्रेशर व कोलेस्टेरॉलचा धोका वाढतो.
धूम्रपान
तरुणांमध्ये धूम्रपान करण्याचा ट्रेंड सध्या लक्षणीयरित्या वाढला आहे. कमी वयाचे तरुण-तरुणीही आजकाल सर्रास धूम्रपान करताना दिसतात. धूम्रपान करणं आपल्या आरोग्यासाठी अजिबात चांगलं नाही, मात्र अनेक लोक तरीही धूम्रपान करतात. धूम्रपान केल्यामुळे शरीरातील चांगल्या कोलेस्टेरॉलचं प्रमाण कमी होतं आणि बॅड कोलेस्टेरॉलचं प्रमाण खूप वाढतं. तुम्हाला हाय कोलेस्टेरॉलची समस्या आधीच असेल तर तुम्ही सिगारेट ओढणं तातडीने सोडायलाच हवं.