जमशेदपुर : सध्या उन्हाळा सुरू झाल्याने सर्वांना उन्हाच्या झळा बसत आहेत. अशा परिस्थिती बदलत्या हवामानामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी फार महत्त्वाची असते. त्यामुळे एप्रिल महिन्यातही काही ठिकाणी शाळा सुरु होतात आणि पुढच्या सेशनचे वर्ग सुरू होतात. अशा परिस्थितीमध्ये मुलांना शाळेत जाणे महत्त्वाचे आहे. म्हणून मुलांचा उन्हापासून बचाव व्हावा, यासाठी पालकांनी काय काळजी घ्यावी, हे जाणून घेऊयात.
advertisement
लोकल18 ला याबाबत माहिती देताना बालरोगतज्ञ डॉ. सुभाजित बॅनर्जी यांनी सांगितले की, सध्या जमशेदपूरचे तापमान दररोज 38 ते 40 डिग्री अंश सेल्सिअस इतके आहे. इतर अनेक ठिकाणी उष्णतेच्या लाटेबाबत अलर्ट जारी करण्यात आला आहे. अशा परिस्थितीत लहान मुलांबाबत अत्यंत सावध राहण्याची गरज आहे.
त्यांनी सांगितले की, तीव्र सूर्यप्रकाशामुळे तीन प्रकारच्या समस्या उद्भवतात. पहिली म्हणजे उष्मा क्रॅम्प. यामुळे शरीरात पेटके येतात. दुसरे म्हणजे उष्णतेचा ताण. यामुळेळे अशक्तपणा आणि पोटदुखी होते. तिसरा सर्वात जास्त प्रभावित करणारा उष्माघात आहे. यामुळे मुले किंवा प्रौढ बेशुद्ध देखील होतात.
सापसुद्धा यायला घाबरतात असा रहस्यमयी आश्रम, याचठिकाणी झाली होती कलियुगाची सुरुवात, photos
मुलांना शाळेत पाठवताना घ्या ही काळजी -
सर्वात आधी तुम्ही मुलांना टोपी आणि चष्मा घालावा. टिफिनमध्ये काकडी, टरबूज, खरबूज, पपई, केळी यांचा समावेश असलेली जास्तीत जास्त फळे द्यावीत. यासोबतच कमीतकमी 2 लिटर लिंबू आणि साखर मिसळून पाण्याचे ड्रींक तयार करा आणि ते मुलांना द्या किंवा दही आणि मठ्ठा द्या. यामुळे शरीरात पाण्याची कमतरता भासणार नाही. रुटीनमध्ये तुम्ही मुलांना नारळाचे पाणीही दररोज पिण्यासाठी देऊ शकता. तसेच दिवसातून किमान दोनदा आंघोळ करावी, असेही त्यांनी सांगितले.
हीट स्ट्रोकची लक्षणे -
डॉक्टरने पुढे सांगितले की, उष्माघातात शरीराचे तापमान 103 अंशांपेक्षा जास्त असू शकते. तुम्हाला पोटदुखी आणि पेटके येण्याची तक्रार सुरू होईल. किंवा उलट्याही होऊ शकतात. म्हणून अशा परिस्थितीत ताबडतोब जवळच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असे ते म्हणाले.
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती, औषधी आणि आरोग्यविषयक सल्ले तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहेत. ही सामान्य सार्वजनिक आहे. हा वैयक्तिक सल्ला नाही. त्यामुळे कोणतीही गोष्ट डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच वापरावी. होणाऱ्या कोणत्याही प्रकारचे नुकसान झाल्यास लोकल-18 जबाबदार राहणार नाही.