सापसुद्धा यायला घाबरतात असा रहस्यमयी आश्रम, याचठिकाणी झाली होती कलियुगाची सुरुवात, photos

Last Updated:
पश्चिम उत्तर प्रदेशातील मेरठपासून 25 किलोमीटर अंतरावरील महाभारतकालीन किल्ला परीक्षितगडमध्ये आजही वेगवेगळी रहस्ये आहेत, असे सांगितले जाते. त्यामुळे आजही याबाबत सर्वांच्या मनात उत्सुकता कायम आहे. असाच काहीसा उल्लेख श्री श्रृंग ऋषि आश्रम (श्रृंगी ऋषि आश्रम) यांच्याबाबत ऐकायला मिळतो. याबाबत सांगितले जाते की, या आश्रमाच्या आजूबाजूला सापांचा समूह असायचा. मात्र, एका घटनेनंतर सापांना याठिकाणी येण्याची भीती वाटू लागली. (विशाल भटनागर, प्रतिनिधी)
1/10
गेल्या अनेक वर्षांपासून शोभित विद्यापीठाचे सहाय्यक प्राध्यापक आणि इन्स्टिट्यूट ऑफ नॅचरल सायन्सेसचे अध्यक्ष महाभारत काळातील या क्षेत्रात सातत्याने संशोधन करत आहेत.

advertisement
2/10
संशोधन करणारे प्रियंक भारती याबाबत सांगतात की, भागवत महापुराण आणि महाभारतात असा उल्लेख आहे की एकदा राजा परीक्षित शिकारीसाठी जंगलात गेले होते. तेव्हा त्यांना अचानक खूप भूक आणि तहान लागली होती.

3/10
जेव्हा ते जंगलातील एका आश्रमात पोहोचले तेव्हा त्यांनी पाहिले की, एक ऋषी कठोर तपस्येमध्ये लीन होते. त्यांचे नाव शमीक ऋषी होते. राजा परीक्षित यांनी शमीक ऋषी यांना अनेकदा उठवण्याचा प्रयत्न केला. मात्र, जेव्हा ते तपस्येतून जागे झाले नाहीत तेव्हा त्यांनी जवळच पडलेला एक मृत नाग आपल्या धनुष्याच्या टोकाच्या सहाय्याने शमिक ऋषींच्या गळ्यात घातला.

4/10
यानंतरही त्यांची तपश्चर्या भंग नाही झाली. मात्र, असे म्हटले जाते की, हे सर्व दृश्य शमीक ऋषी यांचे पूत्र श्रृंगी ऋषी यांनी पाहिले. ते अन्य ऋषिकुमारांसह खेळत होते. वडिलांच्या अपमानामुळे संतप्त होऊन त्यांनी कौशिकी नदीच्या पाण्याने आचमन करत राजा परीक्षितला सर्पदंशाने मरण्याचा शाप दिला.

5/10
प्रियंक भारती याबाबत सांगतात की, विविध पौराणिक आणि ऐतिहासिक गोष्टींमध्ये नमूद केले आहे की, राजा परीक्षितचा मृत्यू तक्षक सर्पाच्या दंशामुळे झाल्यानंतर त्यांचा पुत्र जनमेजय याने संतप्त होऊन सर्प जातीला नष्ट करण्याचा संकल्प केला होता. तसेच त्यासाठी त्यांनी श्रृंगी ऋषी आश्रमाच्या प्रांगणात यज्ञ सुरू केला होता.

6/10
ते हळूहळू सापांचा बळी देत ​​होते. त्यामुळे सापांचे अस्तित्वाचे संकट पाहून तक्षक नागाने भगवान इंद्राकडे मदत मागितली. यानंतर इंद्रदेवाने राजा जनमेजयाला समजावले. तेव्हाच त्यांनी यज्ञ थांबवला होता.

7/10
तेव्हापासून आतापर्यंत या आश्रम परिसरात सापांसंदर्भात विविध मान्यता आहेत. जसे की, या परिसरात साप यायला घाबरतात. तर कुणी म्हणतो की, याठिकाणी कुणालाही सर्पदंश होत नाही.

8/10
आजही तुम्हाला या आश्रम परिसरात या मान्यतांबाबत अनेक तथ्ये पाहायला मिळतील. याठिकाणी तुम्हाला शमिक ऋषी आणि श्रृंगी ऋषी यांची मूर्ती दिसेल. त्या घटनेचे वर्णन करणाऱ्या इतरही अनेक गोष्टी इथे पाहायला मिळतील.

9/10
आजही याठिकाणी यज्ञशाळा तयार आहे. कलियुगाची सुरुवात याच आश्रमातून झाली होती, असे सांगितले जाते.

10/10
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती राशिचक्र, धर्म आणि शास्त्राच्या आधारे ज्योतिषी आणि आचार्यांशी चर्चा केल्यानंतर लिहिली आहे. याबाबत लोकल18 कोणताही दावा करत नाही.

Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement