Romantic Dinner Spots : पार्टनरसोबत घालवा Quality Time! पाहा रोमँटिक डिनर डेटसाठी परफेक्ट डेस्टिनेशन..
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
Romantic dinner destinations in mumbai : लक्झरी यॉटवर घालवलेली संध्याकाळ हा एक परफेक्ट आणि अविस्मरणीय अनुभव ठरू शकतो. समुद्राच्या मधोमध, शहराच्या गोंगाटापासून दूर, फक्त तुम्ही दोघे आणि प्रेमळ वातावरण.. याहून सुंदर दुसरे काय असू शकते?
मुंबई : दैनंदिन आयुष्याच्या धावपळीतून थोडा वेळ काढून जोडीदारासोबत शांत, रोमँटिक आणि खास क्षण घालवणे प्रत्येक नात्यासाठी गरजेचे असते. अशा वेळी मुंबईच्या समुद्रात लक्झरी यॉटवर घालवलेली संध्याकाळ हा एक परफेक्ट आणि अविस्मरणीय अनुभव ठरू शकतो. समुद्राच्या मधोमध, शहराच्या गोंगाटापासून दूर, फक्त तुम्ही दोघे आणि प्रेमळ वातावरण.. याहून सुंदर दुसरे काय असू शकते?
मुंबईच्या कुलाबा येथील शांत पाण्यात फिरणाऱ्या आलिशान यॉटवर तुम्ही रोमँटिक डिनरचा अनुभव घेऊ शकता. थंड वाऱ्याची झुळूक, हातात वाईनचा ग्लास आणि समोर मुंबईच्या चमचमणाऱ्या लाईट्स. हे दृश्यच मन मोहून टाकणारे असते. स्वादिष्ट जेवण आणि आरामदायी यॉटमुळे तुमची संध्याकाळ आणखी रोमँटिक आणि संस्मरणीय बनते.
जोडीदारासाठी परफेक्ट गिफ्ट..
वाढदिवस, अॅनिव्हर्सरी, प्रपोज डे किंवा सरप्राईज डेटसाठी यॉट हा एक उत्कृष्ट पर्याय आहे. हा पूर्णपणे खासगी आणि एक्सक्लुझिव्ह अनुभव असतो. यामध्ये सर्व व्यवस्था आधीच केलेली असते. तुम्ही कोणतीही चिंता न करता फक्त क्षणांचा आनंद लुटायचा.
advertisement
पॅकेजमध्ये काय समाविष्ट आहे?
- 2 तासांचे एक्सक्लुझिव्ह यॉट क्रूझिंग
- एकाच कपलसाठी खास व्यवस्था
- सौम्य आणि रोमँटिक म्युझिक
- डिनरसाठी खास सेटअप
- गरज असल्यास फॉइल बलून डेकोरेशन
- अतिरिक्त सुविधांची व्यवस्था
अतिरिक्त खर्चावर पुढील गोष्टींची सोय करून दिली जाते
- केक
- फुलांचा बुके
- फ्रूट शॅम्पेन
- आवडीनुसार कस्टमाइज्ड डिनर
advertisement
पॅकेजमध्ये काय समाविष्ट नाही?
- अल्कोहोल
- डिनरचा खर्च
- यॉटवर जेवण पोहोचवण्याचे चार्जेस
वेळा आणि दर (उपलब्ध स्लॉट्स)
संध्याकाळी 6.00 ते 8.00
संध्याकाळी 7.00 ते 9.00
संध्याकाळी 8.00 ते 10.00 (1,000 रुपये अतिरिक्त)
मॅकग्रेगर 26 यॉटचे दर
आठवड्याचे दिवस (सोमवार ते शुक्रवार) : 7,500 रुपये
वीकेंड आणि सुट्ट्या: 8,000 रुपये
जोडीदारासोबत प्रेम, शांतता आणि लक्झरीचा अनुभव घ्यायचा असेल, तर मुंबईतील ही लक्झरी यॉट सफर नक्कीच एक परफेक्ट डेस्टिनेशन ठरू शकते. bookmysailing.com यावर तुम्ही अधिक माहिती घेऊ शकता आणि बुकिंग करू शकता.
advertisement
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Dec 29, 2025 1:45 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Romantic Dinner Spots : पार्टनरसोबत घालवा Quality Time! पाहा रोमँटिक डिनर डेटसाठी परफेक्ट डेस्टिनेशन..










