1 जानेवारीपासून रेशन कार्डवर कुणाला किती धान्य मिळणार? मोठी अपडेट आली समोर

Last Updated:
Ration Card :  राज्यातील शिधापत्रिकाधारकांसाठी नववर्षाच्या सुरुवातीपासून रेशन धान्य वाटप पद्धतीत पुन्हा एकदा महत्त्वाचा बदल होणार आहे.
1/5
Ration Card
राज्यातील शिधापत्रिकाधारकांसाठी नववर्षाच्या सुरुवातीपासून रेशन धान्य वाटप पद्धतीत पुन्हा एकदा महत्त्वाचा बदल होणार आहे. नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यांत प्रयोगात्मक स्वरूपात गव्हासोबत ज्वारीचा समावेश करण्यात आला होता. या काळात लाभार्थ्यांना गहू, ज्वारी आणि तांदूळ असा मिश्र धान्यपुरवठा करण्यात आला. मात्र जानेवारीपासून रेशनवर ज्वारीचे वितरण थांबवण्यात येणार असून, धान्याचे प्रमाण आणि प्रकार पुन्हा बदलण्यात आले आहेत.
advertisement
2/5
Ration Card
मागील दोन महिन्यांत अंत्योदय अन्न योजना आणि प्राधान्य कुटुंब योजनेअंतर्गत धान्यवाटपात बदल करण्यात आले होते. अंत्योदय योजनेतील लाभार्थ्यांना प्रत्येकी पाच किलो गहू, पाच किलो ज्वारी आणि तब्बल 25 किलो तांदूळ देण्यात आला होता. तर प्राधान्य कुटुंबांसाठी आधी मिळणाऱ्या दोन किलो गहू व तीन किलो तांदळाऐवजी एक किलो गहू आणि एक किलो ज्वारी देण्यात येत होती. त्यामुळे अनेक लाभार्थ्यांना प्रथमच रेशनमध्ये ज्वारी मिळाल्याचा अनुभव आला.
advertisement
3/5
ration card
नोव्हेंबरपासून सुरू झालेल्या या नव्या पद्धतीमुळे काही ठिकाणी समाधान व्यक्त करण्यात आले, तर काही भागांत ज्वारीच्या वापराबाबत अडचणीही समोर आल्या. याच पार्श्वभूमीवर शासनाने जानेवारीपासून पुन्हा एकदा पारंपरिक धान्यवाटप पद्धती लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे रेशन दुकानांवर ज्वारीचा पुरवठा बंद होणार असून, लाभार्थ्यांना पुन्हा गहू आणि तांदूळच मिळणार आहेत.
advertisement
4/5
ration card
नव्याने किती धान्य मिळणार? -  राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम, 2013 अंतर्गत निश्चित करण्यात आलेल्या मूळ धान्यप्रमाणानुसार नव्या वर्षात धान्यवाटप करण्यात येणार आहे. 
advertisement
5/5
ration card
जानेवारी 2026 पासून अंत्योदय अन्न योजनेतील शिधापत्रिकाधारकांना दरमहा 21 किलो गहू आणि 14 किलो तांदूळ, असे एकूण 35 किलो धान्य मिळणार आहे. तर प्राधान्य कुटुंब योजनेत प्रत्येकी लाभार्थ्याला दरमहा तीन किलो गहू आणि दोन किलो तांदूळ देण्यात येणार आहे.
advertisement
BMC Election BJP : भाजपचा ‘३० मिनिट्स प्लॅन’! बंडखोरी रोखण्यासाठी शेवटच्या क्षणी असा टाकणार मोठा डाव
भाजपचा ‘३० मिनिट्स प्लॅन’! बंडखोरी रोखण्यासाठी शेवटच्या क्षणी असा टाकणार मोठा डा
  • महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आता शेवटचे काही तास शिल्लक राहिल

  • भाजपने बंडखोरांना चितपट करण्यासाठी ३० मिनिट्स प्लॅन तयार केला

  • संभाव्य बंडखोरीला आळा घालण्यासाठी पक्षाने ही नवी रणनिती आखल्याचे समोर आले आहे

View All
advertisement