Pune Election : पुण्याचे दिवंगत नेते गिरीश बापट यांच्या सुनेला भाजपकडून उमेदवारी, मुक्ता टिळक यांचे पुत्र कसब्यातून लढणार!
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Pune BJP PMC Election : भाजपते वरिष्ठ दिवंगत खासदार गिरीश बापट यांची सुनेला भाजपने उमेदवारी जाहीर केली आहे. गिरीश बापट यांची सून स्वरादा बापट यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आलीये.
Pune Municipal Corporation Election 2026 : महापालिका निवडणुका जाहीर झाल्यानंतर आता सर्वच राजकीय पक्षांनी उमेदवार निश्चित करण्यासाठी बैठकांचे सत्र सुरू झालं आहे. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अखेरचे दोन दिवस शिल्लक असताना अजूनही पुण्यातील सर्वच पक्षाच्या याद्या जाहीर झाल्या नाहीत. अशातच आता पुण्यातील हायप्रोफाईल जागेवर कुणाला तिकीट मिळणार? याची चर्चा सुरू असताना भाजपच्या घराणेशाहीमध्ये फिल्डींग (Pune BJP PMC Election) लावली जात असल्याची टीका होताना दिसतीये. अशातच भाजपने दोन मोठे निर्णय घेतले आहेत.
भाजपते वरिष्ठ दिवंगत खासदार गिरीश बापट यांची सुनेला भाजपने उमेदवारी जाहीर केली आहे. गिरीश बापट यांची सून स्वरादा बापट यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आलीये. त्याचबरोबर कसबा विधानसभाच्या माजी आमदार दिवंगत मुक्ता टिळक यांचे सुपुत्र कुणाल टिळक यांना सुद्धा भाजपने उमेदवारी दिली आहे. दोन्ही उमेदवार पुण्यातील प्रभाग क्रमांक 25 मधून उमेदवारी भरणार आहेत.
advertisement
विशेष म्हणजे भाजपकडून 16 नेत्यांची मुलं यंदा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी सज्ज झाल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे या 16 पैकी 12 जण हे मूळ भाजपचेच आहेत. त्यामुळे भाजपवर देखील घराणेशाहीचा आरोप करण्यात येत आहे. त्यामुळे आता विरोधकांना भाजपवर टीका करण्याची आयती संधी मिळाली आहे. आगामी निवडणुकीच्या प्रचारात हा मुद्दा समोर येण्याची शक्यता आहे.
advertisement
दरम्यान, पुण्यात भाजपने 165 पैकी 100 जागा निश्चित केल्या होत्या. ताशी यादी तयार केली होती. आता त्याच यादीतील 60-80 उमेदवारांना भाजपने एबी फॉर्म दिले आहेत. प्रभाग क्रमांक 24 मधील उमेदवार आणि निवडणूक प्रमुख गणेश बिडकर यांचा अर्ज दाखल करण्यात आला. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, आमदार सुनील कांबळे, आमदार हेमंत रासने आणि शहराध्यक्ष धीरजजी घाटे उपस्थित होते.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
Dec 29, 2025 1:01 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
Pune Election : पुण्याचे दिवंगत नेते गिरीश बापट यांच्या सुनेला भाजपकडून उमेदवारी, मुक्ता टिळक यांचे पुत्र कसब्यातून लढणार!









