TRENDING:

शरीरातील सर्वात छोटा अवयव कोणता? तो कुठे असतो आणि काय काम करतो? या अवयवाला म्हणतात 'तिसरा डोळा'

Last Updated:

शरीरातील सर्वात लहान अवयव म्हणजे पायनियल ग्रंथी, जी मेंदूच्या मध्यभागी स्थित आहे. ही ग्रंथी आपल्या बायोलॉजिकल क्लॉक साठी महत्त्वाची आहे, कारण ती मेलनटोनिन हार्मोन तयार करून झोपेचे...

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Smallest organ in body : मानवी शरीरात 78 अवयव आहेत, ज्यांची वेगवेगळी कार्ये आहेत. सर्व अवयव मिळून शरीराचे कार्य सुरळीत ठेवतात. त्वचा हा मानवी शरीरातील सर्वात मोठा अवयव आहे, जो संपूर्ण शरीराला व्यापून टाकतो. यकृत, फुफ्फुसे, हृदय आणि मूत्रपिंड यांचाही सर्वात मोठ्या अंतर्गत अवयवांच्या यादीत समावेश होतो. तुम्हाला माहित आहे का की, आपल्या शरीरातील सर्वात लहान अवयव कोणता आहे आणि त्याचे कार्य काय आहे? बहुतेक लोकांना या प्रश्नाचे उत्तर माहित नसेल. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की शरीरातील सर्वात लहान अवयव कोणता आहे, त्याचा आकार किती असतो आणि त्याचे कार्य काय आहे.
Smallest organ in body,
Smallest organ in body,
advertisement

हा आहे आपल्या शरीरातील सर्वात लहान अवयव

नॅशनल जिओग्राफिकच्या एका रिपोर्टनुसार, त्वचा हा शरीरातील सर्वात मोठा अवयव आहे. एका सामान्य प्रौढ व्यक्तीच्या शरीरावर सुमारे 3.63 किलो वजनाची आणि 22 चौरस फूट लांबीची त्वचा असते. त्वचा संपूर्ण शरीराला व्यापून टाकते आणि बाह्य धोक्यांपासून संरक्षण करण्यासाठी एक संरक्षक थर पुरवते. शरीराच्या वेगवेगळ्या भागांमध्ये तिची जाडी आणि रचना बदलते, पण तिची कार्ये तीच राहतात. जर आपण सर्वात लहान अवयवाबद्दल बोललो, तर पीनियल ग्रंथी (Pineal Gland) हा शरीरातील सर्वात लहान अवयव आहे. ही ग्रंथी खूप लहान असली तरी शरीराच्या अनेक महत्त्वाच्या कार्यांवर नियंत्रण ठेवण्यास मदत करते.

advertisement

आपल्या शरीरात कुठे असतो हा अवयव

शरीरात पीनियल ग्रंथी कुठे असते? शरीरातील सर्वात लहान अवयव मानली जाणारी पीनियल ग्रंथी मेंदूच्या मध्यभागी स्थित असते. पीनियल ग्रंथी मेंदूच्या मधोमध, ब्रेनस्टेमच्या अगदी जवळ असते. ही ग्रंथी मेंदूच्या आत लपलेली असते आणि तिला तिसरा डोळादेखील म्हणतात, कारण ती आपल्या जैविक घड्याळावर नियंत्रण ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. पीनियल ग्रंथीचे मुख्य कार्य मेलाटोनिन नावाचे हार्मोन तयार करणे आहे. हे हार्मोन आपल्या शरीराच्या सर्केडियन रिदम (circadian rhythm) म्हणजेच झोप आणि जागण्याच्या चक्रावर नियंत्रण ठेवते.

advertisement

हा अवयव शारीरिक अन् मानसिक आरोग्यावर करते परिणाम

रात्रीच्या वेळी पीनियल ग्रंथी मेलाटोनिन सोडते, ज्यामुळे आपल्याला झोप येते आणि शरीर विश्रांतीच्या स्थितीत जाते. त्याचप्रमाणे दिवसा तिची क्रियाशीलता कमी होते, ज्यामुळे आपण सतर्क आणि जागरूक राहतो. पीनियल ग्रंथीच्या आकाराबद्दल बोलायचं झाल्यास, पीनियल ग्रंथी साधारणपणे 5 ते 8 मिलीमीटर असते. मेंदूच्या मध्यभागी असलेल्या तिच्या स्थानामुळे तिला पाहणेही कठीण आहे. लहान आकार असूनही तिची कार्ये अत्यंत महत्त्वाची आहेत, कारण ती आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर परिणाम करते.

advertisement

हे ही वाचा : Diet tips for Women : महिलांच्या तंदुरुस्त, निरोगी तब्येतीसाठी मोलाचा सल्ला, आरोग्याच्या अनेक समस्या राहतील दूर

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
कृषी मार्केटमध्ये मोठी उलथापालथ, केळी आणि कांद्याला कवडीमोल भाव, लिंबाची काय स्थिती?
सर्व पहा

हे ही वाचा : Bird Flu : 2 वर्षांच्या मुलाला पालकांनी भरवलं चिकन, झाला बर्ड फ्लू, मुलाचा मृत्यू

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
शरीरातील सर्वात छोटा अवयव कोणता? तो कुठे असतो आणि काय काम करतो? या अवयवाला म्हणतात 'तिसरा डोळा'
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल