advertisement

Diet tips for Women : महिलांच्या तंदुरुस्त, निरोगी तब्येतीसाठी मोलाचा सल्ला, आरोग्याच्या अनेक समस्या राहतील दूर

Last Updated:

महिलांचं शरीर, त्यांची जीवनशैली आणि त्यांच्या आरोग्याशी संबंधित गरजांकडे विशेष लक्ष देणं गरजेचं आहे. योग्य आहार त्यांना केवळ शारीरिकदृष्ट्या निरोगी ठेवत नाही तर मानसिक आणि भावनिक आरोग्य देखील यामुळे सुधारतं.

News18
News18
मुंबई : प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव जसा वेगळा असतो तशी प्रकृतीही वेगळी असते. पाळी, प्रजनन, रजोनिवृत्ती यामुळे, महिलांच्या शरीरात संप्रेरकांचे बदल होतात. त्यामुळे महिलांनी आहाराकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. काही पदार्थांचा आहारात समावेश महिलांसाठी उपयुक्त आहे. यामुळे तब्येत तंदुरुस्त आणि निरोगी तर राहिलच, शिवाय वयानुसार उद्भवणाऱ्या आरोग्याच्या समस्याही टाळता येतील.
महिलांचं शरीर, त्यांची जीवनशैली आणि त्यांच्या आरोग्याशी संबंधित गरजांकडे विशेष लक्ष देणं गरजेचं आहे. योग्य आहार त्यांना केवळ शारीरिकदृष्ट्या निरोगी ठेवत नाही तर मानसिक आणि भावनिक आरोग्य देखील यामुळे सुधारतं.
अक्रोड आणि जवस
अक्रोड आणि जवसात, ओमेगा- 3 फॅटी ॲसिड आणि फायबरचं प्रमाण भरपूर असतं. हृदयाचं आरोग्य, केस आणि त्वचेचं पोषण आणि संप्रेरकाचं संतुलन राखण्यासाठी याची मदत होते. विशेषत: रजोनिवृत्तीच्या काळात स्त्रियांसाठी संप्रेरकांचं संतुलन खूप महत्वाचं आहे.
advertisement
पालेभाज्या
पालक आणि इतर हिरव्या पालेभाज्यांमध्ये लोह, फॉलिक ॲसिड आणि कॅल्शियम भरपूर प्रमाणात असतं. ॲनिमियापासून संरक्षण करण्यासोबतच हाडांच्या मजबुतीसाठी पालेभाज्या आवश्यक आहेत. महिलांना अनेकदा लोहाच्या कमतरतेचा त्रास होतो, त्यामुळे पालेभाज्यांचा आहारात समावेश करा.
दही
दही हा प्रोबायोटिक्सचा उत्कृष्ट स्रोत आहे, ज्यामुळे आतड्यांचं आरोग्य सुधारतं. दह्यामध्ये कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी भरपूर प्रमाणात असतं, ज्यामुळे हाडं मजबूत होण्यास मदत होते. दही खाल्ल्यानं रोगप्रतिकारक शक्ती देखील मजबूत होते.
advertisement
बेरी
स्ट्रॉबेरी, ब्लूबेरी आणि रास्पबेरी यांसारख्या फळांमध्ये अँटिऑक्सिडंट्स भरपूर असतात. त्वचा निरोगी ठेवण्यासाठी आणि कर्करोगासारख्या आजारांना प्रतिबंध करण्यासाठी याचा उपयोग होतो.
मसूर डाळ
मसूर डाळ ही प्रथिनं आणि फॉलिक अ‍ॅसिडचा चांगला स्रोत आहे. स्नायूंची बळकटी, त्वचेवरची चमक आणि गर्भधारणेदरम्यान गर्भाच्या विकासासाठी ही डाळ उपयुक्त आहे.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Diet tips for Women : महिलांच्या तंदुरुस्त, निरोगी तब्येतीसाठी मोलाचा सल्ला, आरोग्याच्या अनेक समस्या राहतील दूर
Next Article
Yuvraj Singh : खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
  • युवराज करिअर कुणामुळे संपलं?

  • धोनी नव्हे तर या दोघांची नावे घेतली

  • धोनीने कठीण काळात युवराजला आधार दिला

View All
advertisement