Weight Loss : बारीक होण्यासाठीच्या सहा टिप्स, सात दिवसात दिसेल फरक
- Published by:Renuka Joshi
Last Updated:
वजन कमी करण्यासाठीच्या प्रयत्नात अपेक्षित परिणाम दिसत नसतील तर, काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवण्याचा फायदा होईल. अनेक प्रकारचे आहार आणि व्यायामशाळेत जाऊनही व्यायाम केले, पण आपल्या खाण्याच्या सवयी चुकीच्या असतील तर वजन कमी करणं कठीण होऊ शकतं.
मुंबई : वजन कमी करण्यासाठी आहारात बदल केले तर आठवडाभरात फरक दिसेल. त्यासाठी संध्याकाळी 6 नंतर आणि रात्रीच्या आहारात काही गोष्टी दूर ठेवाव्या लागतील. कोणते पदार्थ टाळले पाहिजेत याविषयी आहारतज्ज्ञांचा सल्ला घेणं गरजेचं आहे.
वजन कमी करण्यासाठीच्या प्रयत्नात अपेक्षित परिणाम दिसत नसतील तर, काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवण्याचा फायदा होईल. अनेक प्रकारचे आहार आणि व्यायामशाळेत जाऊनही व्यायाम केले, पण आपल्या खाण्याच्या सवयी चुकीच्या असतील तर वजन कमी करणं कठीण होऊ शकतं.
advertisement
1. साखरेचे पदार्थ
वजन कमी करण्यासाठीचा तज्ज्ञांनी दिलेला पहिला सल्ला म्हणजे, संध्याकाळी सहानंतर केक, कुकीज आणि चॉकलेट असे गोड पदार्थ खाणं टाळा. कॅलरी जास्त असल्यानं गोड खाल्ल्यामुळे पोटावर चरबी जमा होते, ज्यामुळे वजन वाढू शकतं. हा बदल करणं सुरुवातीला थोडं कठीण असू शकतं, पण नंतर तुम्हाला याची सवय होईल.
advertisement
2. मांसाहार
रात्री heavy proteins म्हणजेच जड प्रथिनं टाळण्याची देखील शिफारस आहारतज्ज्ञ करतात. प्रथिनं शरीराला आवश्यक आहेत पण, काहीवेळा मांसाहारासारखे जड पदार्थ पचण्यास कठीण जाऊ शकतात, ज्यामुळे झोपेच्या वेळी पोटाच्या समस्या उद्भवू शकतात. हे टाळणं शक्य नसेल तर चिकन ब्रेस्ट किंवा अंडी यांसारख्या हलक्या प्रथिनांचं सेवन करण्याचा सल्ला दिला जातो.
advertisement
3. कार्बोनेटेड पेय
आपल्या आरोग्यासाठी कार्बोनेटेड पेय उपयुक्त नाहीत. वजन कमी करण्याचे प्रयत्न करत असाल तर विशेषतः संध्याकाळी 6 नंतर हे पूर्णपणे टाळणं महत्त्वाचं आहे. यामध्ये सोडा, बिअर आणि स्पार्कलिंग वॉटरचा समावेश आहे. यामुळे गॅस, ब्लोटिंग आणि चरबी वाढण्याचं प्रमाण वाढतं.
advertisement
4. डेअरी उत्पादनं
संध्याकाळी सहानंतर दुग्धजन्य पदार्थांपासून दूर राहण्याचा सल्ला पोषणतज्ज्ञ देतात. दुग्धजन्य पदार्थ पचनासाठी खूप जड असतात आणि त्यामुळे पोट फुगणं आणि पचनाच्या समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे संध्याकाळी आणि रात्री दूध, चीज, दही आणि मलई टाळण्याचा सल्ला आहारतज्ज्ञ देतात.
5. रिफाईन्ड कर्बोदकं
advertisement
संध्याकाळी आणि रात्रीच्या आहारात, पांढरा तांदूळ, पास्ता किंवा ब्रेड आवडत असला तरी त्यांचा आहारात समावेश करणं थांबवा. या पदार्थांमुळे इन्सुलिन वाढतं आणि पोटाची चरबी वाढते.
6. तळलेले पदार्थ
भजी, फ्रेंच फ्राईज, कचोरी, समोसे असे तळलेले पदार्थ संध्याकाळी सहानंतर खाणं टाळा. या पदार्थांमध्ये कॅलरी जास्त असतात आणि यामुळे चयापचयाचा वेग कमी होतो, ज्यामुळे जास्त चरबी जमा होते. त्यामुळे हे पदार्थ टाळण्याचा सल्ला आहारतज्ज्ञ देतात.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Apr 02, 2025 5:33 PM IST










