Healthy Juice : तीन भाज्यांचा ज्यूस ठेवेल तब्येत ठणठणीत, अपचन, अशक्तपणा होईल दूर

Last Updated:

पालक, गाजर आणि बीटरूट या तीन भाज्यांमध्ये भरपूर पोषक घटक असतात. या तीन भाज्यांचा रस आरोग्यासाठी उपयुक्त आहे. फक्त, आरोग्याच्या काही समस्या असतील तर डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर हा ज्यूस पिणं योग्य ठरेल.

News18
News18
मुंबई : चौरस आहार तब्येतीसाठी महत्त्वाचा आहेच, यात भाज्या, भाकरी, पोळी, भात हे पौष्टिक घटक महत्त्वाचे आहेत. शिवाय भाज्यांचा ज्यूसही आरोग्यासाठी पौष्टिक आहे. पालक, गाजर आणि बीटरूट या तीन भाज्यांमध्ये भरपूर पोषक घटक असतात. या तीन भाज्यांचा रस आरोग्यासाठी उपयुक्त आहे. फक्त, आरोग्याच्या काही समस्या असतील तर डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर हा ज्यूस पिणं योग्य ठरेल.
हिवाळ्याच्या हंगामात या भाज्या मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात आणि या हंगामात विशेषतः गाजर आणि बीटरूटचा रस खातात. या ज्यूसमध्ये पालक टाकणं आणखी फायदेशीर ठरू शकतं. याव्यतिरिक्त, गाजर, बीटरूट आणि पालकचा रस प्यायल्यानं आरोग्याशी संबंधित अनेक समस्या दूर होतात. वजन कमी करणं, तसंच पचनाशी संबंधित समस्या दूर करण्यासाठी देखील या रसाचा उपयोग होतो. या रसामध्ये भरपूर जीवनसत्त्व, खनिजं आणि अँटीऑक्सिडंट असतात.
advertisement
हंगामी आजारांपासून रक्षण
पालक, गाजर, बीट ज्यूसमुळे हंगामी आजारांचा धोका कमी होतो. या ज्यूसमुळे रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. गाजरांमध्ये व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात असते. बीट आणि पालकामध्ये आढळणारी पोषक तत्व हंगामी आजारांपासून वाचवण्यास मदत करतात.
advertisement
बद्धकोष्ठता आणि अपचनाची समस्या
बद्धकोष्ठता आणि अपचन सारख्या समस्या कमी करण्यासाठी, गाजर, बीट आणि पालकाचा रस उपयुक्त ठरू शकतो. या रसामुळे पचनक्रिया मजबूत राहण्यास मदत होते. शरीरही डिटॉक्स होतं.
रक्तासाठी पोषक
पालक आणि बीटामध्ये भरपूर प्रमाणात लोह असतं, त्यामुळे शरीरातील अशक्तपणाची भरुन निघण्यास मदत होते.
advertisement
त्वचेसाठी उपयुक्त
गाजर, बीट आणि पालकाचा रस प्यायल्यामुळे त्वचा आतून चमकण्यास मदत होईल. शरीराला डिटॉक्स करण्यासाठी हा ज्यूस फायदेशीर आहे.
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Healthy Juice : तीन भाज्यांचा ज्यूस ठेवेल तब्येत ठणठणीत, अपचन, अशक्तपणा होईल दूर
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement