पहिल्या दिवशीच 60 कोटी पार! 'बॉर्डर 3' नंतर 'गदर 3' ही येणार, अमिषा पटेलनं दिली मोठी अपडेट
- Published by:Minal Gurav
Last Updated:
नुकतीच बॉर्डर 3 सिनेमाची घोषणा करण्यात आली. त्यानंतर आता सनी देओलचा गदर 3 ही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अभिनेत्री अमिषा पटेल हिनं सिनेमाबाबत मोठी हिंट दिली आहे.
सनी देओलचा 'बॉर्डर 2' हा सिनेमा नुकताच रिलीज झाला असून सिनेमा बॉक्स ऑफिसवर खूप चांगली कमाई करतोय. तब्बल 29 वर्षांनी 'बॉर्डर 2' प्रेक्षकांच्या भेटीला आला. बॉर्डर 2 बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत असतानाच निर्मात्यांनी 'बॉर्डर 3' येणार असल्याची घोषणा केली आहे. अशातच सनी देओलच्या कल्ट क्लासिक गदर सिनेमाचाही तिसरा पार्ट येणार असल्याची मोठी अपडेट समोर आली आहे.
advertisement
advertisement
advertisement
रविवारी संध्याकाळी अमिषा पटेलने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर Q&A सेशन घेतलं होतं. या सेशनमध्ये तिने चाहत्यांच्या विविध प्रश्नांना मनमोकळेपणाने उत्तरं दिली. 'रेस 2'च्या आठवणींपासून ते बॉलिवूडमधील बदलत्या ट्रेंड्सपर्यंत अनेक विषयांवर अमिषाने भाष्य केलं. याच दरम्यान अनेक चाहत्यांनी तिच्या बॉलिवूडमधील कमबॅकबद्दल उत्सुकता व्यक्त केली.
advertisement
advertisement
advertisement








