advertisement

शरद पवारांनी भाकरी फिरवली, अकोल्यात समीकरण बदललं, काँग्रेसचा मोठा गेम?

Last Updated:

अकोला महानगरपालिकेत सत्तास्थापनेच्या हालचालींनी आता वेग आला आहे. याबाबत अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयातून मोठी बातमी समोर येत आहे.

News18
News18
अकोला महानगरपालिकेत सत्तास्थापनेच्या हालचालींनी आता वेग आला आहे. याबाबत अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयातून मोठी बातमी समोर येत आहे. बहुमतासाठी आवश्यक असलेला 'जादुई आकडा' गाठण्यासाठी भाजपने जोरदार मोर्चेबांधणी केली असून मित्रपक्षांच्या सोबतीने सत्तेचा दावा केला आहे.
अकोला महापालिकेत ३८ जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भारतीय जनता पक्षाने आता बहुमत सिद्ध करण्यासाठी आवश्यक असलेली जुळवाजुळव पूर्ण केली आहे. अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयात भाजप आपल्या नवनिर्वाचित नगरसेवकांसह मित्रपक्षांच्या नगरसेवकांची गटनोंदणी करण्यासाठी दाखल झाला आहे.
अकोला महापालिकेत एकूण ८० जागा असून बहुमतासाठी ४१ हा आकडा आवश्यक आहे. भाजपकडे स्वतःचे ३८ नगरसेवक आहेत. मात्र, आता त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट), राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट), शिवसेना (शिंदे गट) आणि एका अपक्ष नगरसेवकाच्या पाठिंब्यावर ४४ नगरसेवकांचा गट तयार केल्याचा दावा केला आहे.
advertisement

भाजपने मांडलेले संख्याबळ:

भाजप: ३८
राष्ट्रवादी (शरद पवार गट): ०३
राष्ट्रवादी (अजित पवार गट): ०१
शिवसेना (शिंदे गट): ०१
अपक्ष: ०१
एकूण: ४४

विभागीय आयुक्तांकडे गटनोंदणी सुरू

अमरावती विभागीय आयुक्त श्वेता सिंगल यांच्या उपस्थितीत भाजपच्या नवनिर्वाचित नगरसेवकांच्या गटाची पडताळणी प्रक्रिया सुरू आहे. या प्रक्रियेसाठी भाजपचे प्रमुख नेते आणि नगरसेवक विभागीय आयुक्त कार्यालयात दाखल झाले आहेत. शरद पवार गटाच्या ३ नगरसेवकांनी भाजपला पाठिंबा दिल्याने राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे. यामुळे प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसच्या रणनीतीला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे.
advertisement

महाविकास आघाडीचे प्रयत्न अपयशी?

दुसरीकडे, काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीने देखील सत्ता स्थापनेसाठी प्रयत्न सुरू केले होते. मात्र, भाजपने 'शहर सुधार आघाडी'च्या माध्यमातून मित्रपक्षांना सोबत घेत बहुमताचा ४१ चा आकडा पार केल्याने अकोला महापालिकेवर भाजपचाच महापौर बसण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
शरद पवारांनी भाकरी फिरवली, अकोल्यात समीकरण बदललं, काँग्रेसचा मोठा गेम?
Next Article
advertisement
Eknath Shinde: महापालिका निकालानंतर महायुतीत बिनसलं? एकनाथ शिंदेंची सलग दुसऱ्या कॅबिनेट बैठकीला दांडी, नेमकं कारण आलं समोर
महापालिका निकालानंतर महायुतीत बिनसलं? शिंदेंची सलग दुसऱ्या कॅबिनेटला दांडी,
  • राज्याच्या राजकीय वर्तुळात महापालिका निवडणुकीनंतर मोठ्या घडामोडी सुरू आहेत.

  • आज होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गैरहजर राहणा

  • मागील बैठकीतही एकनाथ शिंदे हे अनुपस्थित होते.

View All
advertisement