Shani Uday 2026: प्रतिक्षा करायला लागणार पण एप्रिलमध्ये भाग्योदय; शनिचा उदय झाल्यावर 3 राशींना सोन्याचे दिवस
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Shani Astrology: वर्ष 2026 मध्ये शनी रास बदलणार नाही. पण त्याच्या स्थिती काही बदल दिसून येणार आहेत. ज्योतिष शास्त्रामध्ये शनी देवाला कर्मफळदाता ग्रह मानले जाते. व्यक्ती जसे कर्म करते, तसे फळ शनिदेव देतात. शनी वेळोवेळी आपली स्थिती बदलत असतात, कधी उदय तर कधी अस्त.
advertisement
मीन राशीत शनीचा उदय - एप्रिल 2026 मध्ये शनिदेव मीन राशीत उदित होणार आहेत. या बदलामुळे काही राशींच्या जीवनात प्रगतीचे नवीन मार्ग खुले होऊ शकतात. नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना चांगल्या संधी मिळतील आणि उत्पन्नाचे स्रोत वाढण्याचे संकेत आहेत. करिअर आणि आर्थिक बाबतीत हा काळ अनेक लोकांसाठी मजबूती देणारा ठरू शकतो.
advertisement
वृषभ - वृषभ राशीच्या लोकांसाठी शनीचा उदय प्रामुख्याने धन आणि लाभाशी संबंधित बाबतीत शुभ ठरणार आहे. शनी तुमच्या कुंडलीतील लाभ भाव सक्रिय करतील, ज्यामुळे उत्पन्न वाढण्याचे योग येतील. या काळात तुमच्या योजना हळूहळू योग्य दिशेने पुढे सरकतील आणि गुंतवणुकीतून फायदा मिळू शकतो. समजूतदारपणाने घेतलेले निर्णय तुम्हाला सन्मान आणि ओळख मिळवून देतील. अचानक धनलाभाची शक्यताही निर्माण होत आहे. कौटुंबिक बाबींमध्ये सहकार्य मिळेल आणि आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा अधिक चांगली होऊ शकते. शेअर बाजार किंवा जोखमीच्या गुंतवणुकीतही लाभाचे संकेत आहेत, परंतु विचारपूर्वक पाऊल टाकणे आवश्यक राहील.
advertisement
advertisement
मिथुन राशीच्या लोकांची विचारपूर्वक निर्णय घेण्याची क्षमता वाढेल, ज्यामुळे चुकांची शक्यता कमी होईल. नात्यांमध्ये संतुलन राहील आणि संवादातून अनेक गुंतागुंतीचे प्रश्न सुटू शकतात. या काळात नवीन गुंतवणूक किंवा भागीदारीचा एखादा मार्ग लाभ देऊ शकतो. संशोधन किंवा विश्लेषणाशी संबंधित काम करणाऱ्यांसाठी हा काळ विशेष फायदेशीर ठरेल.
advertisement
मकर राशीच्या लोकांसाठी शनीचा उदय उत्साह आणि प्रगती घेऊन येऊ शकतो. या काळात तुमची मेहनत फळाला येईल आणि दीर्घकाळापासून अडकलेले पैसे परत मिळू शकतात. नवीन काम सुरू करण्यासाठी किंवा एखाद्या प्रकल्पावर पुढे जाण्यासाठी हा काळ अनुकूल आहे. तुमची सामाजिक प्रतिष्ठा वाढेल आणि लोक तुमच्या कामाची प्रशंसा करतील. आत्मविश्वास वाढल्यामुळे तुम्ही मोठे निर्णय घेऊ शकाल. या कालावधीत वाहन किंवा मालमत्ता खरेदी करण्याचे योगही जुळून येऊ शकतात. भावंडांची साथ लाभेल आणि कौटुंबिक सहकार्यामुळे तुमची कामे सोपी होतील.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)









