उरले फक्त 2 दिवस! जया एकादशीला 'हे' 3 उपाय करताच बदलेल नशीब, पैसा, प्रमोशन, जे हवं ते मिळणार
- Published by:Manasee Dhamanskar
Last Updated:
हिंदू धर्मात एकादशीच्या व्रताला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला 'जया एकादशी' असे म्हणतात. यंदा ही एकादशी गुरुवार, 29 जानेवारी 2026 रोजी साजरी केली जाणार आहे.
Jaya Ekadashi 2026 : हिंदू धर्मात एकादशीच्या व्रताला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला 'जया एकादशी' असे म्हणतात. यंदा ही एकादशी गुरुवार, 29 जानेवारी 2026 रोजी साजरी केली जाणार आहे. या दिवशी भगवान विष्णूंची पूजा केल्याने केवळ पापांतून मुक्ती मिळत नाही, तर जीवनातील आर्थिक संकटे दूर होऊन प्रगतीचे मार्ग मोकळे होतात. विशेषतः यंदा ही एकादशी गुरुवारी आल्याने तिचे महत्त्व अधिक वाढले आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, या दिवशी काही विशेष उपाय केल्यास तुमचा 'बँक बॅलेन्स' वाढू शकतो आणि नोकरीत बढतीचे योग जुळून येऊ शकतात.
जया एकादशीला करायचे 3 प्रभावी उपाय
1. पिवळ्या वस्तूंचा वापर आणि दान
भगवान विष्णूंना पिवळा रंग अत्यंत प्रिय आहे. गुरुवारी एकादशी असल्याने पिवळ्या रंगाचे महत्त्व दुप्पट होते. या दिवशी आवर्जून पिवळे वस्त्र परिधान करावे. भगवान विष्णूंना गूळ आणि चणा डाळीचा नैवेद्य अर्पण करावा. यामुळे कुंडलीतील गुरु ग्रह मजबूत होतो, जो सुख आणि संपत्तीचा कारक आहे. पूजेनंतर हे साहित्य गरजू व्यक्तीला दान केल्यास अडकलेली कामे मार्गी लागतात.
advertisement
2. अभिजित मुहूर्तावर 'अलार्म'चा विशेष उपाय
या एकादशीला वेळेचे नियोजन खूप महत्त्वाचे आहे. 29 जानेवारी रोजी दुपारी 12:13 ते 12:56 या दरम्यान 'अभिजित मुहूर्त' आहे. आपल्या फोनमध्ये दुपारी ठीक 12 वाजून 13 मिनिटांचा अलार्म सेट करा. हा मुहूर्त अत्यंत शुभ मानला जातो. अलार्म वाजताच घरातील देवाऱ्यासमोर शुद्ध तुपाचा दिवा लावा आणि आपल्या प्रगतीसाठी प्रार्थना करा. या मुहूर्तावर केलेली प्रार्थना थेट ईश्वरापर्यंत पोहोचते आणि नोकरी-व्यवसायात यश मिळते.
advertisement
3. आवडीच्या वस्तूचा त्याग आणि नियम
एकादशी हे केवळ उपासनेचे व्रत नसून ते संयमाचे प्रतीक आहे. या दिवशी मनावर ताबा मिळवण्यासाठी तुमच्या आवडत्या एका वस्तूचा किंवा सवयीचा (उदा. गोड पदार्थ, चहा इ.) त्याग करा. तसेच, एकादशीच्या दिवशी चुकूनही भाताचे सेवन करू नका. धार्मिक मान्यतेनुसार एकादशीला भात खाल्ल्याने पुण्य क्षीण होते.
advertisement
जया एकादशीचा हा शुभ संयोग तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवून आणू शकतो. केवळ श्रद्धा ठेवून केलेले हे छोटे उपाय तुमच्या मेहनतीला नशिबाची जोड देतील. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 27, 2026 12:15 PM IST
मराठी बातम्या/अध्यात्म/
उरले फक्त 2 दिवस! जया एकादशीला 'हे' 3 उपाय करताच बदलेल नशीब, पैसा, प्रमोशन, जे हवं ते मिळणार









