advertisement

फ्री नाही तर WhatsApp-Insta वापरण्यासाठी भरावे लागणार पैसे? कंपनीने दिली मोठी अपडेट

Last Updated:
तुम्ही कोणतंही अॅप घ्या, त्यात ढिगभर अॅड येतात, जर तुम्हाला जाहिरात नको तर त्यासाठी पैसे भरून सब्स्क्रिप्शन घ्यावं लागतं. गेले कित्येक वर्ष आपण फुकटात वापरत असलेल्या WhatsApp साठी देखील आता पैसे मोजावे लागणार आहेत. कंपनी यासंदर्भात लवकरच एक प्लॅन आणण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे युजर्सना पैसे भरावे लागतील. पण मग कुणालाच WhatsApp Free वापरता येणार नाही का? तर कंपनीचा प्लॅन काय आहे जाणून घेऊया.
1/6
गेल्या अनेक वर्षांपासून आपण व्हॉट्सॲप कोणत्याही जाहिरातीशिवाय आणि मोफत वापरत आहोत. पण आता ही सुविधा इतिहास जमा होण्याची शक्यता आहे. फेसबुक आणि इन्स्टाग्रामची मालकी असलेल्या 'मेटा' कंपनीने आता व्हॉट्सॲपच्या माध्यमातून कमाई करण्याचा मोठा प्लॅन आखला आहे. रिपोर्टनुसार, व्हॉट्सॲपवर आता 'ॲड-फ्री' (Ad-Free) अनुभवासाठी युजर्सना मासिक शुल्क मोजावे लागण्याची शक्यता आहे.

2/6
व्हॉट्सॲपच्या नव्या अपडेटमध्ये काही खास कोड्स सापडले आहेत, जे एका नव्या सबस्क्रिप्शन प्लॅनकडे इशारा करतात. मेटा आता व्हॉट्सॲपमध्ये जाहिराती दाखवण्याच्या तयारीत आहे. तुमच्या खाजगी मेसेजेसमध्ये सध्या तरी जाहिराती येणार नाहीत. मात्र, तुम्ही जेव्हा कोणाचे स्टेटस पाहाल किंवा चॅनल्स चेक कराल, तेव्हा तुम्हाला मध्येच जाहिरातींचा अडथळा येईल.

3/6
 जर तुम्हाला या जाहिराती नको असतील, तर जसं आपण यूट्यूबवर जाहिराती टाळण्यासाठी यूट्यूब प्रीमियम घेतो, अगदी तसच तुम्हाला कंपनीला ठराविक पैसे देऊन प्रीमियम सबस्क्रिप्शन घ्यावं लागेल. गेल्या वर्षी जेव्हा मेटाने व्हॉट्सॲप स्टेटसमध्ये जाहिराती दाखवण्याचे संकेत दिले होते, तेव्हा जगभरातील युजर्सनी याला विरोध केला होता.

4/6
व्हॉट्सॲपची ओळख ही क्लीन आणि प्रायव्हेट मेसेंजर म्हणून आहे, त्यामुळे तिथे जाहिराती येणे युजर्सना मान्य नाही. मात्र, मेटाने आपला विचार बदललेला नाही. सध्या युरोपमधील काही देशांमध्ये याची चाचणी सुरू असून लवकरच हा बदल भारतातही लागू होऊ शकतो.

5/6
अनेकांना प्रश्न पडला आहे की, जाहिराती दाखवण्यासाठी व्हॉट्सॲप आमचे खाजगी मेसेज वाचणार का? तर कंपनीने स्पष्ट केले आहे की, व्हॉट्सॲपचे चॅटिंग नेहमीप्रमाणे 'एंड-टू-एंड एनक्रिप्टेड' राहील. म्हणजेच तुमचे मेसेज सुरक्षित असतील, पण तुमच्या आवडीनिवडीनुसार स्टेटस किंवा चॅनल्समध्येच जाहिरातींचा समावेश असेल.

6/6
टेकक्रंचच्या मंगळवारच्या अहवालानुसार, मेटा प्लॅटफॉर्म्स येत्या काही महिन्यांत इंस्टाग्राम, फेसबुक आणि व्हॉट्सॲपसह आपल्या ॲप्सवर नवीन सबस्क्रिप्शन मॉडेल्सची चाचणी करणार आहे. मेटाच्या प्रवक्त्याने पुष्टी केलेल्या या अहवालात म्हटले आहे की, या सबस्क्रिप्शनमुळे सशुल्क वापरकर्त्यांना अधिक वैशिष्ट्ये आणि विस्तारित एआय क्षमतांमध्ये प्रवेश देऊन
टेकक्रंचच्या मंगळवारच्या अहवालानुसार, मेटा प्लॅटफॉर्म्स येत्या काही महिन्यांत इंस्टाग्राम, फेसबुक आणि व्हॉट्सॲपसह आपल्या ॲप्सवर नवीन सबस्क्रिप्शन मॉडेल्सची चाचणी करणार आहे. मेटाच्या प्रवक्त्याने पुष्टी केलेल्या या अहवालात म्हटले आहे की, या सबस्क्रिप्शनमुळे सशुल्क वापरकर्त्यांना अधिक वैशिष्ट्ये आणि विस्तारित एआय क्षमतांमध्ये प्रवेश देऊन "अधिक उत्पादकता आणि सर्जनशीलता" उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे.
advertisement
Gold Silver Price:  ट्रम्प यांची एक धमकी अन् बाजारात उलथापालथ, सोन्यानं गाठला रेकोर्ड ब्रेक दर, चांदीही महागली, एक्सपर्ट म्हणतात, 'आता...'
ट्रम्प यांची एक धमकी अन् बाजारात उलथापालथ, सोन्यानं गाठला रेकोर्ड ब्रेक दर, चां
  • मागील काही दिवसांपासून सोनं-चांदीच्या दरात तुफान तेजी आली आहे.

  • सोनं-चांदीचे दर नवीन उच्चांक गाठत आहेत.

  • आज, जागतिक बाजारपेठेत सध्या सोन्याने सर्व रेकॉर्ड मोडीत काढले आहेत.

View All
advertisement