Indian Railway : रेल्वे प्रवाशांच्या खिशावरील ओझं वाढणार! तिकीट कॅन्सलच्या नियमात बदल
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
भारतातील बहुसंख्य लोक हे ट्रेनने प्रवास करतात. यापैकी बरेच लोक हे रिझर्व्हेशन करतात. पण काही कारणांमुळे हे तिकीट कॅन्सल करावं लागतं. आता या कॅन्सलेशनच्या नियमांत बदल झालाय.
मुंबई : भारतीय रेल्वे ही सर्वसामान्यांसाठी अत्यंत महत्त्वाचं वाहतुकीचं साधन मानली जाते. भारतातील कोट्यवधी लोक रोज रेल्वेने प्रवास करतात. बहुसंख्य लोक हे आता ऑनलाइन रिझर्व्हेशन करतात. तर काही लोक हे प्रत्यक्ष जाऊनही रिझर्व्हेशन तिकीट बुक करत असतात. काही वेळा आपला प्लॅन कॅन्सल झाल्याने हे तिकीटही कॅन्सल करावे लागतात. पण आता ट्रेन तिकीट कॅन्सल करण्याच्या नियमात मोठा बदल होणारेय. तुम्ही गाडी सुटण्याच्या 8 तास आधी तिकीट कॅन्सल केलं तर कोणताही रिफंड मिळणार नाही. 8 ते 24 तासांच्या दरम्यान तिकीट कॅन्सल केल्यावर 50% पैसा कट होईल. तर 24 ते ते 72 तासांपूर्वी तिकीट कॅन्सल केल्यास 25% कपात होईल.
72 तासांच्या आधी तिकीट कॅन्सल केल्यास जुन्या नियमांमनुसार सामान्य रिफंड मिळेल. यासोबतच आता ऑफलाइ तिकीटही कुठूनही कॅन्सल केलं जाऊ शकतं. पहिले ही सुविधा फक्त टर्मिनेट स्टेशनवर होती. सोबतच तुम्ही तुमच्या प्रवासाचे डिटेल्स गाडी सुटण्याच्या 30 मिनिटं आधीपर्यंत अपडेट करू शकता. 1 ते 15 एप्रिल दरम्यान हे सर्व बदल होईल.
advertisement
तुम्ही आता ट्रेन सुटण्याच्या 30 मिनिटं आधीपर्यंत तुमचं बोर्डिंग स्टेशन बदलू शकता. जे लोक ट्रॅफिक जाम किंवा इतर अडचणीत अडकलेय त्यांच्यासाठी हे फायदेशीर आहे. पहिले ही सुविधा चार्ट तयार होण्यापूर्वी मिळायची. पण आता ति जास्त सोपी आणि डिजिटल झालीये. सोबतच गरज पडल्यावर क्लासही चेंज करता येऊ शकतो. म्हणजेच थर्ड एसीवरुन सेकेंड एसी किंवा स्लीपर.
advertisement
ट्रेन तिकीट कॅन्सिलेशनचे जुने नियम कोणते?
पहिले कन्फर्म तिकीट कॅन्सल केल्यावर वेळेच्या हिशोबाने वेगवेगळे चार्ज लागायचे. ट्रेन सुटण्याच्या 48 तासांहून जास्त आधी तिकीट कॅन्सल केलं तर फक्त फ्लॅट चार्ज कट व्हायचा.
advertisement
एक्जीक्यूटिव्ह क्लासमध्ये 240 रुपये आणि सोबतच GST. AC क्लासमध्ये 180 रुपये आणि सोबतच जीएसटी. यासोबतच 48 तासांपासून ते 12 तास आधी कॅन्सल केल्यास 25% भाडं कट व्हायचं. 12 ते 4 तासांपूर्वी तिकीट कॅन्सल केल्यावर 50% भाडं कट व्हायचं. गाडी सुटण्याच्या 4 तास आधी तिकीट कॅन्सल केलं नाही तर कोणतंही रिफंड मिळायचं नाही.
advertisement
वेटलिस्ट तिकीटावर फक्त 20 रुपये आणि सोबतच जीएसटी कट व्हायचा. चार्ज तयार झाल्यानंतरही तिकीट पूर्णपणे वेटलिस्ट राहिले तर ऑटोमॅटिक कॅन्सल व्हायचं. यानंतर पूर्ण पैसे कोणत्याही कपातीशिवाय परत मिळायचे. ट्रेन पूर्णपणे रद्द होणे किंवा 3 तासांहून जास्त लेट झाल्यावरही TDR देऊ पूर्ण रिफंड मिळायचा.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 24, 2026 3:47 PM IST
मराठी बातम्या/मनी/
Indian Railway : रेल्वे प्रवाशांच्या खिशावरील ओझं वाढणार! तिकीट कॅन्सलच्या नियमात बदल








