advertisement

Nashik News: बॉल दिला नाही म्हणून घेतला सुड; पुरुष अन् महिलांनी मिळून भररस्त्यातच...; नाशिक हादरलं

Last Updated:

नाशिकमधील पंचवटी परिसरातील औदुंबरनगरमध्ये एका कुटुंबाने शेजारील महिलेला काही क्षुल्लक कारणावरून मारहाण केली आहे. या घटनेमुळे पंचवटी परिसर हादरलं आहे.

News18
News18
नाशिक: नाशिकमध्ये एक धक्कादायक प्रकार घडला आहे. शहरातील पंचवटी परिसरातील औदुंबरनगरमध्ये एक धक्कादायक प्रकार घडला आहे. एका क्षुल्लक कारणावरून शेजाऱ्यांसोबत जोरदार वाद झाला आहे. या वादाचे रूपांतर मारहाणीमध्ये झाले आहे. या प्रकरणामुळे सध्या परिसरामध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. परिसरामध्ये, काही लहान मुलं चेंडू खेळत होते. चेंडू खेळत असताना तो अचानक घरामध्ये आला. घरात आलेला चेंडू महिलेने त्या मुलांना परत न दिल्यामुळे एका कुटुंबाने शेजारच्या महिलेला जबरदस्त मारहाण केली आहे. क्षुल्लक कारणावरून मारहाण झाल्यामुळे सध्या परिसरामध्ये या प्रकरणाची जोरदार चर्चा होत आहे.
नेमकं प्रकरण काय?
नाशिकमधील, पंचवटी परिसरातील औदुंबरनगरामध्ये रस्त्यावर काही लहान मुलं चेंडू खेळत होते. चेंडू खेळत असताना त्यांचा चेंडू खेळता खेळता एका महिलेच्या घरात गेला. घरात गेल्यामुळे त्या महिलेने चेंडू मुलांच्या पुन्हा दिला नाही. त्यामुळे रागाच्या भरात संतोष रोकडे आणि संदेश रोकडे या दोघांनीही रागाच्या भरात त्या महिलेच्या घराचा दरवाजा ठोकला. नंतर त्यांच्या घरात प्रवेश केला. "आमच्या नातीला चेंडू का देत नाही?" असं म्हणत तिला मारहाण केली. शिवाय तिला शिव्या सुद्धा त्यांनी दिल्या. त्यांच्या मारहाणीचा एक महिला व्हिडिओ काढत होती. व्हिडिओ काढणाऱ्या महिलेचा मोबाईल दोन्हीही संशयितांनी हिसकावून घेतला. या घटनेची सध्या पंचवटी परिसरात जोरदार चर्चा होत आहे.
advertisement
दरम्यान, त्या महिलेला दोन महिलांनी आणि एका पुरूषाने मारहाण केली आहे. त्या तिघांच्याही भितीने ती महिला पळून चालली होती, पण तिला दोघांनी पकडून आणून मारहाण केली. महिलेने अखेर सुटका करत 112 या हेल्पलाईन क्रमांकावरून मदत मागितली. काही वेळातच पोलिसांनी तिला मदत सुद्धा केली. दरम्यान, मारहाण झालेल्या महिलेने पंचवटी पोलीस ठाण्यामध्ये या प्रकरणाचा गुन्हा नोंदवला आहे. पोलीस पथकाकडून संशयितांविरोधात तक्रार दाखल केली असून घटनेची सविस्तर चौकशी केली जात आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केलेली आहे की नाही, याची माहिती मिळालेली नाही. इतक्या क्षुल्लक कारणावरून नागरिकांमध्ये आपआपसात वाद झाल्यामुळे सध्या पोलिसांमध्ये ह्या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/नाशिक/
Nashik News: बॉल दिला नाही म्हणून घेतला सुड; पुरुष अन् महिलांनी मिळून भररस्त्यातच...; नाशिक हादरलं
Next Article
Maharashtra Kesari : दोनदा गदा मिळाली पण इच्छा अपूर्णच राहिली, विजयानंतर हर्षवर्धनने मनातली खदखद बोलून दाखवली
दोनदा गदा मिळाली पण इच्छा अपूर्णच राहिली, विजयानंतर हर्षवर्धनने मनातली खदखद बोलून दाखवली
  • हर्षवर्धनने मनातली खदखद बोलून दाखवली

  • विजयानंतर इच्छा अपूर्णच

  • पहिली प्रतिक्रिया काय?

View All
advertisement