advertisement

Pune: पालिकेचा 'हा' रीलस्टार पाहिला का? गळ्यात ओळखपत्र, डोळ्यावर गॉगल पण डोक्यात हवा; कर्मचाऱ्याचा अजब प्रताप

Last Updated:

पुणे पालिकेची ही मोहीम शिस्तबद्ध कारवाई होती की निव्वळ 'शो-बाजी', असा सवाल आता पुणेकर विचारत आहेत.

News18
News18
अभिजीत पोते, प्रतिनिधी
पुणे : पुणे महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने कर्वेनगर परिसरात केलेल्या कारवाईपेक्षा सध्या त्या कारवाईचा 'व्हिडिओ' सोशल मीडियावर अधिक चर्चेचा विषय ठरला आहे. डोळ्यावर काळा गॉगल आणि चित्रपट स्टाईल एन्ट्री असलेल्या या 'रिल'मुळे पालिका कर्मचाऱ्यांच्या शिस्तीवर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
पुणे महानगरपालिकेचा अतिक्रमण विभाग हा नेहमीच आक्रमक कारवाईसाठी ओळखला जातो. मात्र, सध्या या विभागाची चर्चा कारवाईमुळे नसून एका कर्मचाऱ्याच्या 'फिल्मी' स्टाईल व्हिडीओमुळे होत आहे. कर्वेनगर भागात दोन दिवसांपूर्वी झालेल्या अतिक्रमण विरोधी मोहिमेदरम्यान, एका कर्मचाऱ्याने चक्क 'स्लो मोशन' आणि गाण्यांचा इफेक्ट देऊन स्वतःचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर प्रसारित केला आहे. यामुळे पालिकेची ही मोहीम शिस्तबद्ध कारवाई होती की निव्वळ 'शो-बाजी', असा सवाल आता पुणेकर विचारत आहेत.
advertisement

कोण आहे 'तो' रीलस्टार कर्मचारी?

पुण्यातील कर्वेनगर भागात दोन दिवसांपूर्वी महापालिकेने अनधिकृत दुकानं, उपाहारगृह आणि फळविक्रेत्यांवर बुलडोझर चालवून मोठी कारवाई केली. या मोहिमेत सर्व नियम धाब्यावर बसवून रस्ते अडवणाऱ्यांवर कारवाई अपेक्षित होती. मात्र, प्रत्यक्ष कारवाई सुरू असताना पालिकेचा एक कर्मचारी डोळ्यावर काळा गॉगल लावून, कडक 'टाईट इन' करून आणि हातात मोबाईल घेऊन एखाद्या दाक्षिणात्य चित्रपटातील नायकाप्रमाणे वावरताना दिसला. विशेष म्हणजे, या संपूर्ण कारवाईच्या प्रत्येक फ्रेममध्ये हा 'रिल स्टार' कर्मचारी केंद्रस्थानी आहे.
advertisement

नेमकं काय आहे या व्हिडीओमध्ये?

व्हिडिओमध्ये बॅकग्राउंडला धडाकेबाज संगीत लावून आणि एडिटिंग इफेक्ट्स वापरत या कारवाईचे 'ग्लोरिफिकेशन' करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. गळ्यात पालिकेचे ओळखपत्र असतानाही, संबंधित कर्मचारी कामात लक्ष देण्याऐवजी कॅमेरा समोर आल्यावर उभा राहून पोझ देताना दिसत आहे. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर, पालिकेचे कर्मचारी कर्तव्यावर आहेत की रिल्स बनवण्यासाठी? अशा शब्दांत नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.
advertisement
[video width="478" height="850" mp4="https://images.news18.com/news18marathi/uploads/2026/03/Pune-Video-2026-03-823dc16e1619e2362b2ee690d630406d.mp4"][/video]

सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया

हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यावर मजेशीर आणि बोचऱ्या कमेंट्स केल्या आहेत. पुणे पालिकेला नवीन हिरो मिळाला, अशी काहींनी फिरकी घेतली आहे, तर काहींनी लोकांचे पोट मारताना इतकी फॅशन कशासाठी? असा गंभीर प्रश्न विचारला आहे. प्रशासकीय कामात अशा प्रकारे खाजगी प्रसिद्धीसाठी सरकारी यंत्रणेचा वापर करणे किती योग्य आहे, असा सवाल उपस्थित होत आहे.
advertisement
view comments
मराठी बातम्या/पुणे/
Pune: पालिकेचा 'हा' रीलस्टार पाहिला का? गळ्यात ओळखपत्र, डोळ्यावर गॉगल पण डोक्यात हवा; कर्मचाऱ्याचा अजब प्रताप
Next Article
Maharashtra Kesari : दोनदा गदा मिळाली पण इच्छा अपूर्णच राहिली, विजयानंतर हर्षवर्धनने मनातली खदखद बोलून दाखवली
दोनदा गदा मिळाली पण इच्छा अपूर्णच राहिली, विजयानंतर हर्षवर्धनने मनातली खदखद बोलून दाखवली
  • हर्षवर्धनने मनातली खदखद बोलून दाखवली

  • विजयानंतर इच्छा अपूर्णच

  • पहिली प्रतिक्रिया काय?

View All
advertisement