advertisement

Skin Care : ब्युटी स्लिप बनू शकते चेहऱ्यावरच्या सुरकुत्यांचं कारण! तुम्ही चुकीच्या पद्धतीनं तर झोपत नाही ना?

Last Updated:
Sleep And Skin Problems : आपल्या त्वचा छान हेल्दी राहावी यासाठी आपण खूप प्रयत्न करत असतो. अनेकदा महागडं स्किन केअर करतो. एक सवय नकळत आपल्या सर्व मेहनतीवर पाणी टाकते, ती म्हणजे चुकीच्या पद्धतीनं झोपण्याची.
1/7
झोप तर आपल्या त्वचेसाठी खूप गरजेची असते, कारण झोपेतच आपली त्वचा रिपेअर होत असते. पण तुम्हाला हे वाचून आश्चर्य वाटेल की, आपल्या झोपण्याच्या चुकीच्या पद्धतीमुळेही चेहऱ्यावर सुरकुत्या येऊ शकतात आणि त्या वाढू शकतात.

2/7
जागरणने 'जर्नल ऑफ अ‍ॅस्थेटिक सर्जरी'मध्ये प्रकाशित झालेल्या एका संशोधनाबद्दल माहिती दिली आहे. या संशोधनानुसार, आपण कोणत्या पद्धतीनं झोपतो याचा परिणाम मानेवर आणि कमरेवर तर होतोच. पण त्याचबरोबर आपल्या त्वचेवरही होतो. चुकीच्या पद्धतीनं झोपल्यास आपल्या त्वचेवर अकाली वृद्धत्व म्हणजेच सुरकुत्या दिसू शकतात.

3/7
तासंतास एका कुशीवर झोपणं आपल्या त्वचेसाठी घातक ठरू शकतं. कारण एका कुशीवर किंवा पोटावर झोपल्यानं चेहऱ्याची नाजूक त्वचा दीर्घकाळ उशीच्या संपर्कात राहते. या वेळेत चेहऱ्यावर तीन प्रकारचा फोर्स पडतो. पहिला म्हणजे चेहरा दबणं ज्याला कॉम्प्रेशन म्हणतात. दुसरा म्हणजे ताण अर्थात टेन्शन आणि तिसरं म्हणजे घर्षण होणं.

4/7
एका कुशीवर झोपल्याने हे तीन प्रकारचे दाब किंवा फोर्स चेहऱ्याचे स्नायू आणि त्वचा खराब करतात. त्यांचा आकार बिघडवतात. तरुण वयात त्वचा लवचिक असल्यानं लवकर सामान्य होते. मात्र तिशीनंतर कोलेजनचं उत्पादन कमी झाल्यानं या झोपेच्या रेषा सहज जात नाहीत आणि हळूहळू सुरकुत्या बनतात.

5/7
पोटावर झोपणं त्वचेसाठी जास्त घातक समजलं जातं. कारण या स्थितीत पूर्ण चेहरा उशीमध्ये दाबला जातो. त्यानं त्वचेला श्वास घेता येत नाही आणि सुरकुत्यासोबत डोळ्यांखालची सूजही वाढते. एका कुशीवर झोपल्यामुळे गालांवर आणि हनुवटीवर जास्त दाब पडतो. यामुळे चेहऱ्याच्या एकाच बाजूवर दुसऱ्या बाजूच्या तुलनेत अधिक खोल रेषा दिसतात.

6/7
आता तुम्हाला प्रश्न पडला असेल मग नेमकं झोपायचं तरी कसं..? याचा उत्तर आहे पाठीवर. पाठीवर झोपल्यानं सुरकुत्या आणि बारीक रेषा येत नाहीत कारण चेहरा उशीच्या संपर्कात येत नाही आणि त्यामुळे चेहऱ्याच्या त्वचेवर दाब पडत नाही.

7/7
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.

Maharashtra Kesari : दोनदा गदा मिळाली पण इच्छा अपूर्णच राहिली, विजयानंतर हर्षवर्धनने मनातली खदखद बोलून दाखवली
दोनदा गदा मिळाली पण इच्छा अपूर्णच राहिली, विजयानंतर हर्षवर्धनने मनातली खदखद बोलून दाखवली
  • हर्षवर्धनने मनातली खदखद बोलून दाखवली

  • विजयानंतर इच्छा अपूर्णच

  • पहिली प्रतिक्रिया काय?

View All
advertisement