advertisement

Pune News : पुण्यात महाकाय अनाकोंडा दाखल होणार, कुठे पाहता येणार?

Last Updated:

Pune News : पुणेकर आता तुम्हाला महाकाय ॲनाकोंडा पाहता येणार आहे. पण हे कसं शक्य होणार आणि कधी पाहता येणार त्याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

कात्रज प्राणीसंग्रहालयात नव्या मास्टर प्लॅनअंतर्गत विदेशी प्राणी आणि आधुनिक सुविधा उभारण्याची तयारी
कात्रज प्राणीसंग्रहालयात नव्या मास्टर प्लॅनअंतर्गत विदेशी प्राणी आणि आधुनिक सुविधा उभारण्याची तयारी
पुणे : सापाचं नाव ऐकताच प्रत्येकाच्या पायाखालची जमिन सरकरते आणि त्यात जर महाकाय ॲनाकोंडा असेल तर अक्षरशा अंगाचा थपकाप उडतो आणि हाच महाकाय प्राणी तुमच्या शहरात आला तर?. आता असंच काही पुणे शहरात होणार आहे.
कात्रजमध्ये दाखल होणार महाकाय ॲनाकोंडा
पुण्यातील कात्रज राजी गांधी प्राणीसंग्रहालय हे पर्यटकांसाठी त्यातही चिमुकल्यांसाठी एक आवडते ठिकाण आहे. पण आता याच प्राणीसंग्रहालयाचा मोठ्या प्रमाणात विकास होणार आहे. यासाठी पुणे महानगरपालिकेने या प्राणीसंग्रहालयाला आंतरराष्ट्रीय दर्जा देण्यासाठीसाठी मास्टर प्लॅन तयार केलेला आहे. या नव्या प्लॅननुसार भविष्यात पर्यटकांना अधिक आकर्षक आणि आधुनिक सुविधा मिळणार असल्याची माहिती समोर आलेली आहे.
advertisement
सध्याच्या स्थितीला या प्राणीसंग्रहालयाचे क्षेत्रफळ सुमारे 130 एकर असून येथे 104 प्रकारच्या वन्यजीव प्रजाती आहे. पण नव्या प्लॅननुसार ही संख्या वाढवून ती 150 पर्यंत नेण्याचे उद्धिष्ट ठेवण्यात आलेले आहे. यामुळेच प्राणीसंग्रहालयात अनेक देशांतील प्राणी पाहण्याची संधी पर्यटकांना मिळणार आहे.
या प्राणीसंग्रहालयात पर्यटकांना पाहण्यासाठी झेब्रा, जिराफ, आफ्रिकन चित्ता आणि अनाकोंडा यांसारख्या विदेशी प्राण्यांचा समावेश होणार आहे. हे प्राणी विशेषतहा मुलांसाठी आणि पर्यटकांसाठी आकर्षण ठरणार आहेत.
advertisement
एवढेच नाही तर सर्पोद्यानाचे आधुनिकीकरण केले जाणार आहे तसेच नवीन एक बर्ड पार्कही उभारण्यात येणार असून यामध्ये विविध पक्ष्यांच्या प्रजाती पर्यटकांना एकाच ठिकाणी पाहता येतील. या सर्व होणाऱ्या बदलांमध्ये कात्रज प्राणीसंग्रहाल हे एक आधुनिक, अधिक सुंदर आणि पर्यटकांचे आवडेत आकर्षक ठरणार आहे.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
Pune News : पुण्यात महाकाय अनाकोंडा दाखल होणार, कुठे पाहता येणार?
Next Article
Maharashtra Kesari : दोनदा गदा मिळाली पण इच्छा अपूर्णच राहिली, विजयानंतर हर्षवर्धनने मनातली खदखद बोलून दाखवली
दोनदा गदा मिळाली पण इच्छा अपूर्णच राहिली, विजयानंतर हर्षवर्धनने मनातली खदखद बोलून दाखवली
  • हर्षवर्धनने मनातली खदखद बोलून दाखवली

  • विजयानंतर इच्छा अपूर्णच

  • पहिली प्रतिक्रिया काय?

View All
advertisement