advertisement

Eknath Khadse: खडसे सभागृहात येऊ नये म्हणून कोणी जादूटोणा केलाय का? राष्ट्रवादीच्या नेत्याचा विधान परिषदेत खळबळजनक संशय!

Last Updated:

Eknath Khadse : अशोक खरात प्रकरणावरून राजकीय मंडंळींचे मंत्र-तंत्र चर्चेत आहे. आज विधान परिषदेत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार एकनाथ खडसे यांच्यावर कोणी जादूटोणा केलाय का, याची शंका उपस्थित करण्यात आली.

खडसे  येऊ नये म्हणून कोणी करणी केलीय का? राष्ट्रवादीच्या नेत्याचा विधान परिषदेत खळबळजनक संशय!
खडसे येऊ नये म्हणून कोणी करणी केलीय का? राष्ट्रवादीच्या नेत्याचा विधान परिषदेत खळबळजनक संशय!
मुंबई: अशोक खरात प्रकरणावरून राजकीय मंडंळींचे मंत्र-तंत्र चर्चेत आहे. आज विधान परिषदेत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार एकनाथ खडसे यांच्यावर कोणी जादूटोणा केलाय का, याची शंका उपस्थित करण्यात आली. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते शशिकांत शिंदे यांनीच हे भाष्य केले. राज्याचे मंत्री आणि भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी लक्षवेधी प्रश्न लावूनही एकनाथ खडसे अनुपस्थित असल्याबाबत टीका केली. त्याचे पडसाद सभागृहात उमटले.
गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे यांच्यातील राजकीय वाद चांगलाच वाढला आहे. दोन्ही बाजूने संधी मिळताच बोचरी टीका, आरोप-प्रत्यारोप सुरू होतात. राज्याच्या विधान परिषदेतही राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले.
गिरीश महाजन यांनी म्हटले की, एकनाथ खडसे प्रश्न टाकतात, पण सभागृहात उपस्थित नसतात. एकनाथ खडसे एकही दिवस सभागृहात नाहीत. ते घरुन प्रश्न टाकतात, लक्षवेधी प्रश्न लावतात. खडसे यांनी प्रश्न टाकल्यावर सभागृहात यायला हवं असे महाजन यांनी म्हटले. त्यांनी पुढे म्हटले की, एकनाथ खडसे यांनी उपस्थित केलेले प्रश्न दररोज सभागृहात असतात. त्यांच्या या लक्षवेधी लोकांना ब्लॅकमेलिंगसाठी वापरल्या जातात का, असा सवाल केला.
advertisement

खडसेंवर जादूटोणा...?

गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसेंच्या अनुपस्थितीवरून टीकास्त्र सोडल्यानंतर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार शशिकांत शिंदे यांनी एकनाथ खडसे यांचा बचाव केला. त्यांच्या अनुपस्थितीबाबत बाबत शिंदे यांनी सांगितले की, आज एकनाथ खडसे यांच्यासोबत फोनवरून बोलणं झालं. खडसे यांची प्रकृती बरी नाही. त्यामुळे ते सभागृहात नाहीत. मात्र, ते अनुपस्थित राहावे, आजारी असावे, सभागृहात येऊ नये, यासाठी कोणी जादूटोणा केलाय का, याचा तपास करणार असल्याचे शिंदे यांनी म्हटले.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Eknath Khadse: खडसे सभागृहात येऊ नये म्हणून कोणी जादूटोणा केलाय का? राष्ट्रवादीच्या नेत्याचा विधान परिषदेत खळबळजनक संशय!
Next Article
Maharashtra Kesari : दोनदा गदा मिळाली पण इच्छा अपूर्णच राहिली, विजयानंतर हर्षवर्धनने मनातली खदखद बोलून दाखवली
दोनदा गदा मिळाली पण इच्छा अपूर्णच राहिली, विजयानंतर हर्षवर्धनने मनातली खदखद बोलून दाखवली
  • हर्षवर्धनने मनातली खदखद बोलून दाखवली

  • विजयानंतर इच्छा अपूर्णच

  • पहिली प्रतिक्रिया काय?

View All
advertisement