मुंबईत तिघांवर भरचौकात जीवघेणा हल्ला, NCP नेत्याच्या पुतण्याची दहशत, धडकी भरवणारा VIDEO
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
मुलुंड साईप्रेस येथे जुन्या वादातून तिघांवर धारदार हल्ला. सीसीटीव्ही फुटेजवरून Sultan Malik आणि Mahipal Singh अटकेत. राजकीय कनेक्शनची चौकशी.
मुंबईच्या मुलुंड परिसरात रविवारी एक धडकी भरवणारी घटना घडली आहे. मुलुंडमधील साईप्रेस आणि मुलुंड कॉलनी परिसरात दोन गटात झालेल्या वादातून तिघांवर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला करण्यात आला. या प्रकरणातील आरोपींचे राजकीय कनेक्शन समोर आले असून, पोलिसांनी दोन मुख्य आरोपींना अटक केली आहे.
नेमकी घटना काय?
रविवारी दुपारी मुलुंडच्या गजबजलेल्या परिसरात हा प्रकार घडला. पूर्ववैमनस्यातून झालेल्या या वादात आरोपींनी पीडित तिघांवर धारदार शस्त्रांनी सपासप वार केले. या हल्ल्यात तिघेही गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, भररस्त्यात धारदार शस्त्राने हल्ला करत असतानाचे हे भीषण दृश्य परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे. या फुटेजच्या आधारे पोलिसांनी तातडीने तपास चक्र फिरवली.
advertisement
राजकीय धागेदोरे आणि अटक
या प्रकरणात पोलिसांनी सुलतान मलिक आणि महीपाल सिंह या दोघांना अटक केली आहे. अटकेत असलेला सुलतान मलिक हा अजित पवार गटाकडून महानगरपालिका निवडणूक लढवलेले सज्जू मलिक यांचे भाऊ युसुफ मलिक यांचा मुलगा आहे. आरोपींचे थेट राजकीय नेत्यांशी संबंध असल्याचे समोर आल्याने या प्रकरणाला आता राजकीय वळण लागण्याची शक्यता आहे.
advertisement
२५ मार्चपर्यंत पोलीस कोठडी
अटकेनंतर दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर सुलतान मलिक आणि महीपाल सिंह या दोघांनाही २५ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. जुन्या वादातून हा हल्ला झाला असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. मात्र, या हल्ल्यामागे नेमके काय कारण होतं आणि यात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा सखोल तपास पोलीस करत आहेत. या घटनेनंतर मुलुंड कॉलनी आणि साईप्रेस परिसरात या काही काळ तणावाचं वातावरण होतं.
Location :
Nashik,Maharashtra
First Published :
Mar 24, 2026 2:25 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
मुंबईत तिघांवर भरचौकात जीवघेणा हल्ला, NCP नेत्याच्या पुतण्याची दहशत, धडकी भरवणारा VIDEO








