Religious: नित्य पूजा करणाऱ्यांनाही माहीत नसेल; शक्तिपीठ आणि सिद्धपीठामध्ये काय फरक? दोन्हींचे धार्मिक महत्त्व
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Durga Puja : हिंदू धर्मात गुढीपाडव्याच्या दिवसापासून चैत्र नवरात्रीला प्रारंभ होतो. महाराष्ट्रात ठीक ठिकाणी शारदायी नवरात्रीप्रमाणेच चैत्र नवरात्र साजरी केली जाते. या नऊ दिवसांत देवीच्या नऊ रूपांची मनोभावे पूजा केली जाते. सध्या नवरात्रीचा उत्साह असून भाविक देवीच्या मंदिरांना भेटी देत आहेत. अनेकांच्या तोंडी असलेल्या दोन शब्दांचा अर्थ समजून घेणार आहोत. आपण एखाद्या मंदिराला 'शक्तीपीठ' तर एखाद्याला 'सिद्धपीठ' म्हणत असल्याचं ऐकतो. बरेच लोक या दोन्ही गोष्टींना एकच समजतात, पण खरं तर धार्मिक दृष्टिकोनातून यात मोठा फरक आहे. त्याविषयी आपण सोप्या भाषेत समजून घेऊया.
शक्तीपीठ म्हणजे काय?शक्तीपीठांचा संबंध माता सती आणि शंभू महादेव यांच्या पौराणिक कथेशी संबंधित आहे. पौराणिक मान्यतेनुसार, माता सतींनी यज्ञात स्वतःला झोकून देऊन देहत्याग केला, तेव्हा शंभूदेव प्रचंड रागावून त्यांचं शरीर घेऊन तांडव करू लागले. सृष्टीचं संतुलन राखण्यासाठी मग विष्णूंनी आपल्या सुदर्शन चक्राने सतींच्या शरीराचे तुकडे केले. हे शरीराचे भाग पृथ्वीवर जिथे जिथे पडले, त्या ठिकाणांना 'शक्तीपीठ' म्हटलं गेलं. संपूर्ण जगात अशी एकूण 51 शक्तीपीठं मानली जातात. या ठिकाणांना ऊर्जेचं केंद्र मानलं जातं.
advertisement
सिद्धपीठ म्हणजे -सिद्धपीठं ही अशी ठिकाणं आहेत जिथे साधू, संत किंवा महान भक्तांनी कठोर तपस्या करून देवीची कृपा मिळवली आहे. ज्या ठिकाणी भक्तांच्या साधनेमुळे देवी प्रसन्न झाली किंवा जिथे देवी स्वतःहून प्रकट झाली, त्या ठिकाणांना सिद्धपीठ म्हणतात. या जागा कोणत्याही एका पौराणिक घटनेशी (जसं की शरीराचे भाग पडणे) बांधलेल्या नसतात. तर भक्तांची श्रद्धा, तिथे झालेली साधना आणि चमत्कार यामुळे ही ठिकाणं प्रसिद्ध होतात. इथे केलेली प्रार्थना लवकर पूर्ण होते, अशी भाविकांची श्रद्धा असते.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
कोणत्याही नवरात्रीच्या ती शारदीय असो किंवा चैत्र नवरात्र या काळात शक्तीपीठांमध्ये विशेष पूजा, हवन आणि जागरणाचं आयोजन केलं जातं. जीवनात सुख-समृद्धी मिळावी आणि शक्तीचा आशीर्वाद मिळावा म्हणून भक्त या ठिकाणी गर्दी करतात. त्याचप्रमाणे, सिद्धपीठांमध्येही आपली एखादी इच्छा पूर्ण व्हावी या श्रद्धेने भाविक मोठ्या संख्येने गर्दी करतात. या काळात दोन्ही ठिकाणचं वातावरण खूपच भक्तीमय उत्साही असतं. बघा जर एका वाक्यात सांगायचं झाल्यास जिथे सतींच्या शरीराचा अंश पडला ते शक्तीपीठ आणि जिथे भक्तांच्या श्रद्धेने देवी प्रसन्न झाली ते सिद्धपीठ.










