advertisement

Summer Special Trains : वेटिंग लिस्ट विसरा, स्पेशलने प्रवास करा! नागपूर प्रवासासाठी विशेष फेऱ्या; पाहा संपूर्ण वेळापत्रक

Last Updated:

Summer Special Trains : जर तुम्हीही मुंबई आणि पुण्यात राहात आणि नागपूरला फिरायला जाण्याचा विचार आहे तर आता विशेष गाड्या सुरु होणार आहे. चला तर जाणून घ्या या रेल्वेची वेळ काय असेल आणि वेळापत्रक कसे असेल.

पुणे-नागपूर-पुणे मार्गावर धावणार स्पेशल रेल्वे
पुणे-नागपूर-पुणे मार्गावर धावणार स्पेशल रेल्वे
मुंबई : मध्य रेल्वेने उन्हाळी सुट्ट्यांमधील वाढती गर्दी लक्षात घेता काही उपाययोजना केल्या आहेत. लोकमान्य टिळक टर्मिनस-नागपूर आणि पुणे-नागपूर या दोन्ही मार्गांवर विशेष रेल्वे गाड्या सुरु करण्याचे नियोजन हाती घेतले आहे. या अतिरिक्त गाड्यांमुळे भुसावळ विगागात असलेल्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. विशेष म्हणजे या दोन्ही गाड्या या जळगाव स्थानकावर थांबणार असून स्थानिक प्रवाशांसाठी हा निर्णय अधिक फायदेशीर ठरणार आहे.
एलटीटी-नागपूर विशेष रेल्वेच्या 2 फेऱ्यांची घोषणा
1)गाडी क्रमांक 01021 ही विशेष गाडी दिनांक 3 एप्रिल रोजी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून पहाटे साधारण 12.55 वाजता निघेल आणि त्याच दिवशी नागपूर येथे दुपारी 3.45 वाजता पोहचेल. तसचे ही गाडी क्रमांक 01022 ही गाडी 3 एप्रिल रोजी नागपूरमधून रात्री 8 वाजता निघेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी सकाळी साधारण 11.45 ला पोहचेल.
advertisement
2)या विशेष रेल्वे गाड्यांना दोन्ही बाजुने ठाणे तसेच कल्याण, इगतपूरी, नाशिक रोड, मनमाड,जळगाव , भुसावळ, मलकापूर,शेगाव, अकोला, मूर्तिजापूर, बडनेरा आणि धामणगाव, वर्धा या स्थानकांवर थांबा मिळणार असल्याची माहिती समोर आलेली आहे.
पुणे-नागपूर-पुणे मार्गावर धावणार 'स्पेशल' रेल्वे
1) 01467 ही विशेष गाडी शुक्रवार 3 एप्रिल रोजी पुणे स्थानकातून दुपारी 3.50 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी नागपूर येथे सकाळी 6.30 वाजता पोहचेल. शिवाय 01468 ही विशेष गाडी शनिवारी 4 एप्रिल रोजी नागपूर येथून सकाळी 8 वाजता निघणार आणि त्याच दिवशी रात्री 11.30 वाजेपर्यंत पोहोचेल.
advertisement
2) या रेल्वेला दोन्ही बाजूंनी उरुळी, दौंड कॉर्ड लाईन, अहमदनगर, बेलापूर आणि कोपरगाव, मनमाड, जळगाव, भुसावळ,मलकापूर, शेगाव, अकोला, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा या स्थानंकावर थांबा मिळणार आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/नागपूर/
Summer Special Trains : वेटिंग लिस्ट विसरा, स्पेशलने प्रवास करा! नागपूर प्रवासासाठी विशेष फेऱ्या; पाहा संपूर्ण वेळापत्रक
Next Article
Maharashtra Kesari : दोनदा गदा मिळाली पण इच्छा अपूर्णच राहिली, विजयानंतर हर्षवर्धनने मनातली खदखद बोलून दाखवली
दोनदा गदा मिळाली पण इच्छा अपूर्णच राहिली, विजयानंतर हर्षवर्धनने मनातली खदखद बोलून दाखवली
  • हर्षवर्धनने मनातली खदखद बोलून दाखवली

  • विजयानंतर इच्छा अपूर्णच

  • पहिली प्रतिक्रिया काय?

View All
advertisement