90s चे 2 धुरंधर, ज्यांच्यासमोर फिके पडले तिनही खान्स; त्या सिनेमानं एका रात्रीत हादरवलं बॉक्स ऑफिस
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Dhurandhar in 90s : धुरंधर 2 सिनेमाची सध्या सर्वत्र चर्चा आहे. 2025-26 धुरंधरने गाजवला. पण तुम्हाला माहिती आहे का 90च्या दशकात देखील धुरंधर होते. जे सलमान, शाहरुख आणि आमिर या तिन्ही खानला पुरून उरले.
advertisement
advertisement
जेव्हा शाहरुख खान 'दिवाना' आणि 'बाजीगर'मधून आपली रोमँटिक अँटी-हिरोची इमेज बनवत होता. सलमान खान 'मैने प्यार किया'मुळे चॉकलेट बॉय बनला होता. तेव्हा अक्षय कुमार आणि अजय देवगण यांनी अॅक्शनला आपली ओळख बनवलं. 1991 मध्ये 'फूल और कांटे'मधील अजय देवगणच्या एन्ट्रीने तरुणांना प्रेमात पाडलं. 1992 मध्ये अक्षय कुमारने 'खिलाडी'मधील आपल्या मार्शल आर्ट्स कौशल्याने सर्वांना चकित केले.
advertisement
ज्या प्रेक्षकांना चित्रपटगृहांमध्ये थरारक ॲक्शन आणि अंगावर शहारे आणणारे स्टंट पाहायचे होते, त्यांची पहिली पसंती हे दोन स्टार्स बनले. 1994 हे वर्ष एक ऐतिहासिक वर्ष ठरलं. जेव्हा हे दोन दिग्गज पहिल्यांदाच पडद्यावर एकत्र दिसले तो चित्रपट होता 'सुहाग'. जेव्हा दिग्दर्शक कुकू कोहलीने अक्षय आणि अजयला एकत्र घेतले तेव्हा चित्रपटसृष्टीत एकच खळबळ उडाली. चित्रपटातील 'गोरे गोरे मुखडे पे' सारखी गाणी प्रचंड गाजली पण या दोन स्टार्समधील ऑन-स्क्रीन केमिस्ट्री हेच खरे आकर्षण होते.
advertisement
अनेक वर्षांनंतर जेव्हा रोहित शेट्टीने त्याच्या 'कॉप युनिव्हर्स'मधील 'सूर्यवंशी' या चित्रपटाद्वारे या दोन कलाकारांना पुन्हा एकत्र आणले. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रचंड यशस्वी ठरला. अजय देवगणची 'सिंघम'मधील एन्ट्री आणि अक्षय कुमारची 'सूर्यवंशी'मधील चपळाईने हे सिद्ध केले की काळ बदलला असला तरी या दिग्गजांची जादू आजही कायम आहे.
advertisement
असे म्हटले जाते की 90 च्या दशकात अक्षय आणि अजयच्या यशामागे त्यांचे 'कनेक्टिव्हिटी' हे सर्वात मोठे कारण होतं. ते सर्वसामान्य माणसाचे हिरो होते. अक्षयच्या 'खिलाडी' मालिकेने त्याला प्रत्येक तरुणासाठी एक आदर्श बनवलं, तर अजयच्या 'विजयपथ' आणि 'दिलवाले'सारख्या चित्रपटांनी त्याला एक गंभीर प्रियकर आणि बंडखोर नायक म्हणून स्थापित केला.
advertisement








