advertisement

Thane-Belapur Road : तीन उड्डाणपूल, दोन भुयारी मार्ग...ठाणे-बेलापूर सुस्साट प्रवासासाठीचा गेमचेंजर प्लॅन काय?

Last Updated:

Thane-Belapur Road Update : ठाणे-बेलापूर मार्गावर नव्या प्रकल्पाला मंजुरी मिळाली आहे. या प्रकल्पामुळे नवी मुंबईतील वाहतूक कोंडी कमी होणार असून प्रवाशांचा प्रवास अधिक सोयीस्कर होईल. शहरातील पायाभूत सुविधांना यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे.

ठाणे-बेलापूर मार्गावर उभारण्यात येणारे तीन नवीन उड्डाणपूल वाहतूक कोंडी कमी करण्यास आणि नवी मुंबईतील कनेक्टिव्हिटी सुधारण्यास मदत करणार आहेत.
ठाणे-बेलापूर मार्गावर उभारण्यात येणारे तीन नवीन उड्डाणपूल वाहतूक कोंडी कमी करण्यास आणि नवी मुंबईतील कनेक्टिव्हिटी सुधारण्यास मदत करणार आहेत.
नवी मुंबई : गेल्या काही दिवसांपासून नवी मुंबईमध्ये वाहतूक कोंडी वाढत आहे. याच वाढत्या वाहतूक कोंडीवर नवी मुंबई महापालिकेने महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे. यात नवी मुंबई महापालिकेने आता ठाणे ते बेलापूर असलेल्या महामार्गावर तीन उड्डाणपूल उभारण्याचा निर्णय घेतलेला आहे.
नेमका पुल कुठे बांधण्यात येणार?
मिळालेल्या माहितीनुसार ठाणे बेलापूर महामार्गावरील रबाळे, पावणे तसेच तुर्भे येथे हे उड्डाणपूल बांधण्यात येणार आहेत. शिवाय पाम बीच मार्गाच्या शेवटच्या भागी दुहेरी भुयारी मार्ग उभारला जाणार आहे. यात सिग्नलमुक्त वाहतूकीसाठी किल्ले जंक्शन येथे भुयारी मार्गाचा ठराव मंजूर केला आहे.
वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होण्याचे मुख्य कारण ही नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, अटल सेतू आणि ऐरोलीच्या खाडी जोड पुलामुळे हे प्रमाण वाढलेले आहे. या सर्व मार्गांवर गेल्या काही दिवसांत नवी मुंबईत येणाऱ्या वाहनांची संख्या वाढलेली आहे. शिवाय पुनर्विकास प्रकल्पामुळे वाहतुकीवरचा ताणही वाढत असल्याने हा निर्णय घेण्यात आलेला आहे.
advertisement
भुयारी मार्ग आणि तीन उड्डाणपुलांच्या प्रकल्पांची अंबलमबजावणी ही अॅन्युटी मॉडेल पद्धतीने केली जाणा असून या प्रकल्पासाठी लागणारा 30 टक्के रकमेचा खर्च ठेकेदाराला जाणार आहे. तर राहिलेली 70 टक्के खर्च हा पूर्ण झाल्यानंतर दिला जाणार आहे. संपूर्ण प्रकल्पाचे काम झाल्यानंतर 10 वर्षात ती रक्क दिली जाईल असे सांगितले आहे.
view comments
मराठी बातम्या/ठाणे/
Thane-Belapur Road : तीन उड्डाणपूल, दोन भुयारी मार्ग...ठाणे-बेलापूर सुस्साट प्रवासासाठीचा गेमचेंजर प्लॅन काय?
Next Article
Maharashtra Kesari : दोनदा गदा मिळाली पण इच्छा अपूर्णच राहिली, विजयानंतर हर्षवर्धनने मनातली खदखद बोलून दाखवली
दोनदा गदा मिळाली पण इच्छा अपूर्णच राहिली, विजयानंतर हर्षवर्धनने मनातली खदखद बोलून दाखवली
  • हर्षवर्धनने मनातली खदखद बोलून दाखवली

  • विजयानंतर इच्छा अपूर्णच

  • पहिली प्रतिक्रिया काय?

View All
advertisement