Ashok Kharat Case: खंडणी वसूल करण्यासाठी ते व्हिडीओ View Once करून पाठवले, तरी खरात कसा लटकला? समोर आली Inside Story
- Written by:Shrikant Bhosale
Last Updated:
Ashok Kharat Case : अशोक खरातला ब्लॅकमेल करण्यासाठी त्याच्या कारनाम्यांच्या व्हिडीओ क्लिपला त्याला View Once (एकदाच पाहता येणार) करुन पाठवल्या तरी खरातचं सगळं कांड बाहेर आलं.
नाशिक: भोंदू बाबा अशोक खरात याच्या लैंगिक शोषणाचे काळे कारनामे बाहेर येऊ लागले आहेत. या प्रकरणात अनेक धक्कादायक माहिती समोर येत आहे. भोंदू अशोक खरातने खंडणीची तक्रार दाखल केली होती. मात्र, या तक्रारीच्या तपासात त्याच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या. अशोक खरातला ब्लॅकमेल करण्यासाठी त्याच्या कारनाम्यांच्या व्हिडीओ क्लिपला त्याला View Once (एकदाच पाहता येणार) करुन पाठवल्या तरी खरातचं सगळं कांड बाहेर आलं. पोलिसातील भक्ताने त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र, खंडणीची तक्रार करणाऱ्या खरातला लैंगिक शोषणाखाली अटक करण्यात आली.
'व्ह्यू वन्स'ने खरातची झोप उडवली!
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, खरातचे महिलांसोबतचे आक्षेपार्ह व्हिडिओ काही जणांच्या हाती लागले होते. त्यांनी हे व्हिडिओ खरातला व्हॉट्सॲपवर पाठवले. मात्र, समोरच्याने एक मोठी 'गोम' करून ठेवली होती. हे व्हिडिओ 'View Once' मोडवर पाठवण्यात आले होते, म्हणजेच ते फक्त एकदाच पाहता येणार होते. खरातने घाईघाईत काही क्लिप्स पाहिल्या, पण त्याला त्या पुन्हा उघडता आल्या नाहीत. या क्लिप्स पुन्हा पाहण्यासाठी किंवा सेव्ह करण्यासाठी कोणत्या सॉफ्टवेअरचा आधार घ्यावा, हे न सुचल्याने खरातची चांगलीच गोची झाली.
advertisement
बड्या पोलीस अधिकाऱ्याचा 'सल्ला' अंगलट
आपल्या पाठीशी दिग्गज राजकीय नेते आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी असल्याच्या तोऱ्यात वावरणाऱ्या खरातने हा विषय सामोपचाराने मिटवण्याऐवजी समोरच्याला धडा शिकवण्याचे ठरवले. तो थेट नाशिकमधील एका अत्यंत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याला भेटला. हा अधिकारी खरातचा भक्त होता. खरातने या अधिकाऱ्याला 'खंडणी' मागितली जात असल्याची तक्रार केली. या भक्तानेही शहानिशा न करता खरातचा मोबाईल आपल्या विश्वासू टीमकडे सोपवला आणि त्यातील 'डेटा' रिकव्हर करण्याचे आदेश दिले.
advertisement
व्हिडीओ पाहून पोलीसही हादरले, 'भक्त' साहेब अवाक!
एरवी आपल्या 'मंत्र-तंत्रा'ने लोकांना भुलवणारा खरात यावेळी स्वतःच तांत्रिक चक्रव्यूहात अडकला होता. त्याच्या मोबाईलमधील त्या गुपित क्लिप्स उघडण्यासाठी पोलिसांनी सायबर सॉफ्टवेअरचं 'कसब' पणाला लावलं. तांत्रिक प्रक्रिया पूर्ण होऊन जेव्हा 'खुल जा सिम सिम' झालं, तेव्हा स्क्रीनवर उमटलेलं एक-एक दृश्य पाहून अनुभवी पोलीस अधिकारीही सुन्न झाले. समोर जे दिसत होतं, ते इतकं किळसवाणं होतं की आपल्या 'साहेबांना' (जे खरातचे कट्टर भक्त होते) हे कसं सांगायचं, या विचाराने कनिष्ठ कर्मचाऱ्यांच्या पायाखालची जमीन सरकली. अखेर, एका कर्मचाऱ्याने छातीवर दगड ठेवून साहेबांना सत्य परिस्थिती समोर आणली आणि सर्व क्लिप्स त्यांच्या समोर ठेवल्या. हे भयानक कृत्य पाहून खरातचा 'भक्त' असणारा तो अधिकारीही अवाक झाला.
advertisement
खरं तर, त्याच वेळी खरातवर कारवाई होणे अपेक्षित होते, मात्र बदनामी टाळण्यासाठी 'सामंजस्याने' मार्ग काढण्याचा सल्ला या अधिकाऱ्याने दिल्याचं बोललं जातंय. या पोलीस अधिकाऱ्याने क्लीप पाठवणाऱ्या दोघांविरोधात खंडणीची तक्रार दाखल करण्याची सूचना केली. ही सूचना मान्य करत खंडणीची तक्रार करण्यास खरात तयार झाला.
Location :
Nashik,Maharashtra
First Published :
Mar 24, 2026 12:16 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Ashok Kharat Case: खंडणी वसूल करण्यासाठी ते व्हिडीओ View Once करून पाठवले, तरी खरात कसा लटकला? समोर आली Inside Story








