BBM 6 : दोन हप्त्यात एवढ नाटक..! बायको सुपर्णाला पाहून संकेतच्या अश्रूंचा बांध फुटला, नेटकऱ्यांना चांगलाच खटकला
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Bigg Boss Marathi 6 फॅमिली वीकमध्ये संकेत आणि सुपर्णा श्यामचा इमोशनल प्रोमो व्हायरल झाला असून नेटकऱ्यांनी त्यांना जोरदार ट्रोल केलं आहे.
Bigg Boss Marathi 6 चा हा आठवडा खूपच इमोशनल असणार आहे. हा फॅमिली वीक असणार आहे. घरातील वातावरण पूर्णपणे भावनिक झालं आहे. जवळपास 70 दिवसांनंतर स्पर्धकांना त्यांच्या कुटुंबीयांना भेटण्याची संधी मिळाली. प्रत्येक स्पर्धकासाठी हा क्षण खास ठरला. संकेतसाठी हा क्षण अधिकच भावनिक ठरला. संकेतची पत्नी आणि अभिनेत्री सुपर्णा श्याम घरात आली. दोघांचा हा भावनिक क्षण नेटकऱ्यांना मात्र चांगलाच खटकला आहे. प्रोमो पाहून नेटकऱ्यांनी दोघांना ट्रोल केलं आहे.
समोर आलेल्या प्रोमोमध्ये बिग बॉसचं दार उघडताच सुपर्णा संकेतला पाहून ओक्साबोक्शी रडू लागली. घरात प्रवेश करताच सुपर्णाने संकेतला घट्ट मिठी मारली. यावेळी संकेतनेही स्वतःच्या भावना आवरू न शकल्याने तोही रडू लागला. तो आपल्या रूमालाने सुपर्णाचे डोळे पुसताना दिसला. सुपर्णा म्हणाली, "मी वाट पाहत होते रूमाल कधी बाहेर येतो." तिच्या या वाक्यानंतर संकेत आणखी रडू लागला.
advertisement
घराच्या बाहेर बसून दोघांमध्ये मनमोकळा संवाद झाला. संकेतने सुपर्णाला सांगितलं, "खूप डिफिकल्ट आहे. मला इतकी वाईट स्वप्न पडतात. इथे मी कोणालाच सांगू शकत नाही." हे सांगताना संकेतला अश्रू अनावर झाले. त्यावर सुपर्णाने त्याला समजावत "इट्स ओके" म्हणत धीर दिला.
advertisement
संकेत आणि सुपर्णाची ही इमोशनल मोमेंट काहींना आवडली तर काहींना खटकली आहे. सोशल मीडियावर अनेक नेटकऱ्यांनी संकेत आणि सुपर्णाला ट्रोल केलं. एका युझरनं कमेंट करत लिहिलंय, "दोन हप्त्यांत एवढं नाटक करायलेत आणि भारतीय जवानांच्या बायका कशा मन घट्ट करत असतील." दुसऱ्या एका युजरनं लिहिलंय, "आर्मी वाले कसे राहतात, याचं कायपण नाटक चाललंय."
advertisement
advertisement
संकेत आणि सुपर्णाच्या प्रोमोवर आणखी एकानं कमेंट करत लिहिलंय, "मग आलाच कशाला शोमध्ये? नाही जमत तर आधीच सांगायचं होतं". आणखी एकानं लिहिलंय, "दोन आठवड्यात एवढं रडू येतंय, बाकीचे स्पर्धक अडीच महिन्यांपासून आहेत".
संकेत आणि सुपर्णाचा भावनिक क्षण काही प्रेक्षकांना भावला असला तरी सोशल मीडियावर मात्र त्यांना ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 24, 2026 12:06 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
BBM 6 : दोन हप्त्यात एवढ नाटक..! बायको सुपर्णाला पाहून संकेतच्या अश्रूंचा बांध फुटला, नेटकऱ्यांना चांगलाच खटकला









