advertisement

प्रवासांसाठी खुशखबर, मुंबई-पुणे प्रवास आता होणार सुसाट, मिसिंग लिंकबाबत मोठी अपडेट समोर

Last Updated:

मुंबई आणि पुणे या दोन प्रमुख महानगरांमधील प्रवास अधिक जलद, सुरक्षित आणि सुलभ करणारा बहुप्रतिक्षित मिसिंग लिंक प्रकल्प अंतिम टप्प्यात आला आहे.

Missing link
Missing link
पुणे : मुंबई आणि पुणे या दोन प्रमुख महानगरांमधील प्रवास अधिक जलद, सुरक्षित आणि सुलभ करणारा बहुप्रतिक्षित मिसिंग लिंक प्रकल्प अंतिम टप्प्यात आला आहे. येत्या 1 मे, महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर हा मार्ग वाहतुकीसाठी खुला होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या प्रकल्पामुळे मुंबई-पुणे दरम्यानचा प्रवास सुमारे 25 ते 30 मिनिटांनी कमी होणार असून प्रवाशांसाठी हा मोठा दिलासा ठरणार आहे.
सुमारे 6,695 कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेला हा 13.3 किलोमीटर लांबीचा मार्ग खोपोली एक्झिट ते कुसगाव दरम्यान तयार करण्यात आला आहे. या नव्या मार्गामुळे सध्याचे 19 किलोमीटर अंतर सुमारे 6 किलोमीटरने कमी होणार आहे. विशेष म्हणजे खंडाळा घाटातील धोकादायक वळणं, तीव्र चढ-उतार आणि पावसाळ्यातील दरडी कोसळण्याचा धोका टाळता येणार आहे. या प्रकल्पामुळे केवळ वेळेचीच नव्हे तर इंधनाचीही मोठी बचत होणार आहे. अंदाजानुसार, हा मार्ग सुरू झाल्यानंतर दररोज सुमारे 1 कोटी रुपयांचे इंधन वाचू शकते. त्यामुळे पर्यावरणीय दृष्टीनेही हा प्रकल्प महत्त्वाचा ठरणार आहे.
advertisement
मिसिंग लिंक प्रकल्पातील अभियांत्रिकी कामे ही विशेष आकर्षण ठरत आहेत. या मार्गावर 23.5 मीटर रुंदीचे दोन बोगदे तयार करण्यात आले असून ते जगातील सर्वात रुंद बोगद्यांपैकी मानले जात आहेत. यापैकी एक बोगदा 1.64 किलोमीटर तर दुसरा तब्बल 8.92 किलोमीटर लांबीचा आहे. विशेष म्हणजे दुसरा बोगदा लोणावळा तलावाच्या तळापासून सुमारे 180 मीटर खाली बांधण्यात आला आहे, जे अभियांत्रिकी कौशल्याचे उत्कृष्ट उदाहरण आहे.
advertisement
याशिवाय टायगर व्हॅली परिसरात 650 मीटर लांबीचा आणि 182 ते 184 मीटर उंचीवर उभारलेला केबल-स्टेड पूलही या प्रकल्पाचा एक महत्त्वाचा भाग आहे. हा पूल आशियातील सर्वाधिक उंचीच्या पुलांपैकी एक मानला जात असून तो ताशी 252 किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांनाही तोंड देऊ शकतो.
प्रवाशांच्या सुरक्षेसाठी बोगद्यांमध्ये अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यात वॉटर मिस्ट अग्निशमन यंत्रणा, एएनपीआर कॅमेरे आणि लिनिअर हीट डिटेक्शन सिस्टमचा समावेश आहे. तसेच पुलाच्या स्थितीवर सतत लक्ष ठेवण्यासाठी हेल्थ मॉनिटरिंग सिस्टीम देखील कार्यान्वित करण्यात येणार आहे.
advertisement
एकूणच, मिसिंग लिंक प्रकल्पामुळे मुंबई-पुणे प्रवास अधिक वेगवान, सुरक्षित आणि पर्यावरणपूरक होणार असून राज्याच्या पायाभूत सुविधांमध्ये एक महत्त्वाची भर पडणार आहे.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
प्रवासांसाठी खुशखबर, मुंबई-पुणे प्रवास आता होणार सुसाट, मिसिंग लिंकबाबत मोठी अपडेट समोर
Next Article
Maharashtra Kesari : दोनदा गदा मिळाली पण इच्छा अपूर्णच राहिली, विजयानंतर हर्षवर्धनने मनातली खदखद बोलून दाखवली
दोनदा गदा मिळाली पण इच्छा अपूर्णच राहिली, विजयानंतर हर्षवर्धनने मनातली खदखद बोलून दाखवली
  • हर्षवर्धनने मनातली खदखद बोलून दाखवली

  • विजयानंतर इच्छा अपूर्णच

  • पहिली प्रतिक्रिया काय?

View All
advertisement