Gold Silver Price Crash: 56000 रुपयांनी स्वस्त झालं सोनं, चांदीही गडगडली, काय आहेत आजचे दर?
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
डॉलरची झेप आणि डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणवरील मवाळ निर्णय यामुळे MCX वरील चांदी सोनं कोसळले गुंतवणूकदारांना ऐतिहासिक तोटा.
सोन्या चांदीचे दर वाढतात म्हणून ज्यांनी तिथे पैसे गुंतवले त्या सगळ्यांचे पैसे बुडाले आहेत. ज्यांनी काही दिवसांपूर्वी सोन्या-चांदीत गुंतवणूक केली होती, त्यांच्यासाठी मंगळवारचा दिवस मोठा धक्का देणारा ठरला. आंतरराष्ट्रीय बाजारात डॉलरने घेतलेली झेप आणि डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणबाबत घेतलेला एक मवाळ निर्णय, या दोन गोष्टींमुळे सोन्या-चांदीचे भाव पत्त्याच्या बंगल्यासारखे कोसळले. चांदीच्या दरात झालेली ही घसरण आजवरची सर्वात मोठी आणि ऐतिहासिक मानली जात आहे.
चांदी गडगडली गुंतवणूकदारांचं मोठं नुकसान
मंगळवारी सकाळी बाजार उघडताच मल्टि कमोडिटी एक्सचेंजवर (MCX) चांदीचे भाव ११,६०५ रुपयांनी कोसळले. खरं तर, २९ जानेवारीला चांदीने ४,२०,०४८ रुपये प्रति किलोचा विक्रमी टप्पा गाठला होता. पण त्यानंतर जो उतरता काळ सुरू झाला, तो थांबण्याचं नाव घेत नाहीये. आज चांदी २,१३,५६२ रुपयांवर उघडली आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर, अवघ्या काही दिवसांत चांदी तब्बल २ लाख ६ हजार रुपयांनी स्वस्त झाली आहे.
advertisement
मुंबईतील सोन्या चांदीचे दर
२४ कॅरेट प्रति तोळा- १४३०२९
२३ कॅरेट प्रति तोळा- १३७०५१
२२ कॅरेट प्रति तोळा- १३१११०
२० कॅरेट प्रति तोळा- ११९२६५
१८ कॅरेट प्रति तोळा- १०७३२७
चांदीचे दर प्रति किलो- २२४६५६
चांदीपाठोपाठ सोनंही घसरलं
चांदीच्या पावलावर पाऊल ठेवत सोन्यानेही लोटांगण घातले आहे. सोमवारी मोठी घट झाल्यानंतर मंगळवारी सकाळी पुन्हा सोने प्रति १० ग्रॅम २,५७६ रुपयांनी स्वस्त झाले. सोन्याचा भाव आता १,३६,६८४ रुपयांच्या आसपास आला आहे. जानेवारीत उच्चांकी पातळीवर असलेल्या सोन्याच्या दरात आतापर्यंत ५६,४१२ रुपयांची घसरण झाल्याचं पाहायला मिळत आहे. ऑल टाइम हायवरुन सोनं 56 हजार रुपयांनी घसरुन 1 लाख 30 हजारच्या आसपास पोहोचलं आहे.
advertisement
इराणमधील ऊर्जा प्रकल्पांवर होणारे हल्ले ५ दिवसांसाठी स्थगित केल्याने युद्धाचा तणाव कमी झाला. जागतिक बाजारात अमेरिकन डॉलर वधारल्याने सोन्या-चांदीवर दबाव वाढला आहे. अमेरिकन फेड रिझर्व्हने गेल्या आठवड्यात व्याजदरात कपात न करण्याचा निर्णय घेतल्याने गुंतवणूकदारांनी सोन्याऐवजी बॉण्ड्सकडे मोर्चा वळवला आहे. जागतिक आर्थिक विकासाबाबत असलेल्या अनिश्चिततेमुळे मौल्यवान धातूंच्या मागणीत घट झाली आहे. जगभरात आता मंदीची भीती आहे. त्यामुळे वेगानं सोन्या चांदीच्या किंमती घसरत आहेत.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 24, 2026 11:19 AM IST
मराठी बातम्या/मनी/
Gold Silver Price Crash: 56000 रुपयांनी स्वस्त झालं सोनं, चांदीही गडगडली, काय आहेत आजचे दर?








