advertisement

नगरमध्ये मोठा राडा, बाळासाहेब थोरातांच्या भावाकडून अधिकाऱ्याला बेदम मारहाण, VIDEO VIRAL

Last Updated:

अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर येथे सरकारी कार्यालयातच एका कर्मचाऱ्याला बेदम मारहाण झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे.

News18
News18
हरिष दिमोटे, प्रतिनिधी अहिल्यानगर: अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर येथे सरकारी कार्यालयातच एका कर्मचाऱ्याला बेदम मारहाण झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. संगमनेर पंचायत समितीच्या कार्यालयात घुसून तालुका अभियान व्यवस्थापकाला काही जणांनी मारहाण केली. या प्रकरणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचे चुलत बंधू शरद नाना थोरात यांच्यासह ९ ते १० जणांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

नेमका प्रकार काय?

मिळालेल्या माहितीनुसार, संगमनेर पंचायत समिती कार्यालयात दैनंदिन कामकाज सुरू असताना ही घटना घडली. शरद नाना थोरात हे आपल्या सहकाऱ्यांसह कार्यालयात आले आणि त्यांनी थेट तालुका अभियान व्यवस्थापकाला लक्ष्य केले. यावेळी झालेल्या वादाचे पर्यवसान मारहाणीत झाले. मारहाणीचा हा सर्व प्रकार सीसीटीव्ही आणि मोबाइल कॅमेऱ्यात कैद झाला असून, त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
advertisement

पोलिसांत गुन्हा दाखल

या घटनेनंतर पीडित कर्मचाऱ्याने संगमनेर शहर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत रात्री उशिरा शरद नाना थोरात यांच्यासह इतर ९ ते १० जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये शासकीय कामात अडथळा आणणे यासह अन्य गंभीर कलमान्वये गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.

मारहाणीचे कारण अद्याप गुलदस्त्यात

advertisement
एक शासकीय अधिकारी आणि प्रतिष्ठित राजकीय कुटुंबातील व्यक्ती यांच्यात हा वाद नेमका कशामुळं झाला, याचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. राजकीय वर्चस्वातून हा प्रकार घडला की वैयक्तिक कारणातून, याचा तपास आता संगमनेर शहर पोलीस करत आहेत. या घटनेमुळे संगमनेरच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, पोलिसांच्या पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/अहमदनगर/
नगरमध्ये मोठा राडा, बाळासाहेब थोरातांच्या भावाकडून अधिकाऱ्याला बेदम मारहाण, VIDEO VIRAL
Next Article
Maharashtra Kesari : दोनदा गदा मिळाली पण इच्छा अपूर्णच राहिली, विजयानंतर हर्षवर्धनने मनातली खदखद बोलून दाखवली
दोनदा गदा मिळाली पण इच्छा अपूर्णच राहिली, विजयानंतर हर्षवर्धनने मनातली खदखद बोलून दाखवली
  • हर्षवर्धनने मनातली खदखद बोलून दाखवली

  • विजयानंतर इच्छा अपूर्णच

  • पहिली प्रतिक्रिया काय?

View All
advertisement