advertisement

काळाचा क्रूर घाला! पत्नीच्या डोळ्यादेखत पतीचा शेवटचा श्वास, पोटचा गोळा दवाखान्यात मृत्यूच्या दारात

Last Updated:

या अपघातात एका दुचाकीच्या पेट्रोल टाकीचा स्फोट झाल्याने एक जण ठार झाला, तर सहा वर्षांचा मुलगा गंभीर जखमी झाला असून पत्नीही जखमी आहे.

News18
News18
‎छत्रपती संभाजीनगर : पैठण-शेवगाव मार्गावरील पाटेगाव परिसरात रविवारी उशिरा रात्री दोन दुचाकींची समोरासमोर भीषण धडक झाली. या अपघातात एका दुचाकीच्या पेट्रोल टाकीचा स्फोट झाल्याने एक जण ठार झाला, तर सहा वर्षांचा मुलगा गंभीर जखमी झाला असून पत्नीही जखमी आहे. ‎या दुर्घटनेत जितेंद्र हरिश्चंद्र काळे (वय 32, रा. खडकडा, ता. शेवगाव) यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांचा मुलगा निखिल जितेंद्र काळे हा गंभीर जखमी झाला आहे.
‎पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जितेंद्र काळे हे पत्नी आणि मुलासह दुचाकी (एमएच 16 डीबी 3686) वरून आपल्या गावी जात होते. ते पाटेगाव परिसरात पोहोचले असता, समोरून येणाऱ्या (एमएच 20 एमए 3963) या दुसऱ्या दुचाकीने त्यांच्या वाहनाला जोरदार धडक दिली. धडक इतकी तीव्र होती की दोन्ही दुचाकींचे मोठे नुकसान झाले आणि त्यातील एका वाहनाच्या पेट्रोल टाकीचा स्फोट झाला.
advertisement
या भीषण अपघातात जितेंद्र काळे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर पत्नी आणि सहा वर्षांचा मुलगा निखिल हे धडकेनंतर काही अंतरावर फेकले गेले, त्यामुळे ते दोघेही गंभीर जखमी झाले. या प्रकरणी मयताचे वडील हरिश्चंद्र झुंबर काळे यांच्या तक्रारीवरून पैठण पोलिस ठाण्यात संबंधित आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक महादेव गोमारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक वैभव सारंग, जमादार आढाव, हवालदार खिले, फरताळे, आढाट आणि पालवे यांनी घटनास्थळी पंचनामा केला.
advertisement
अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी तत्काळ मदतकार्य सुरू करत जखमींना पैठण येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र तपासणीनंतर डॉक्टरांनी जितेंद्र काळे यांना मृत घोषित केले. दरम्यान, निखिल काळे याची प्रकृती गंभीर असल्याने त्याला पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले आहे. या अपघातातील दुसऱ्या दुचाकीचा चालक हा रहाटगाव येथील रहिवासी असून तो देखील गंभीर जखमी झाला आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
काळाचा क्रूर घाला! पत्नीच्या डोळ्यादेखत पतीचा शेवटचा श्वास, पोटचा गोळा दवाखान्यात मृत्यूच्या दारात
Next Article
Maharashtra Kesari : दोनदा गदा मिळाली पण इच्छा अपूर्णच राहिली, विजयानंतर हर्षवर्धनने मनातली खदखद बोलून दाखवली
दोनदा गदा मिळाली पण इच्छा अपूर्णच राहिली, विजयानंतर हर्षवर्धनने मनातली खदखद बोलून दाखवली
  • हर्षवर्धनने मनातली खदखद बोलून दाखवली

  • विजयानंतर इच्छा अपूर्णच

  • पहिली प्रतिक्रिया काय?

View All
advertisement