Aadhaar Card वरील मोबाईल नंबर बदलायचाय? घरबसल्या होईल काम, फॉलो करा या स्टेप्स
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
Aadhaar Mobile Number Update: आधार कार्ड हे अत्यंत महत्त्वाचं डॉक्यूमेंट आहे. यावर सर्व अपडेटेड माहिती असणं गरजेचं असतं. म्हणून तुमचा नंबर जरी चेंज झाला तर यावर अपडेट करावा लागतो.
Aadhaar Mobile Number Update: प्रत्येक भारतीयाकडे आधार कार्ड असतं. हे अत्यंत महत्त्वाचं डॉक्यूमेंट आहे. यामुळे यावरील माहिती ही अपडेटेड असायलाच हवी. कारण प्रत्येक कामासाठी आता ते आवश्यक आहे. याला लिंक असलेल्या मोबाईल नंबरही तेवढाच महत्त्वाचा असतो. काही काळापूर्वी आधार कार्ड अपडेट करायला आधार सेंटरला भेट द्यावी लागायची. पण आता सर्वच ऑनलाइन झालंय. तुम्ही घरबसल्या अॅपच्या माध्यमातून मोबाईल नंबर अपडेट करू शकता.
advertisement
advertisement
advertisement
कसं अपडेट करावं आधार नंबर? : सर्वात आधी फोनमध्ये आधार अॅप इंस्टॉल करा. आधार अॅप इंस्टॉल्ड असेल तर याचं लेटेस्ट व्हर्जन अपडेट करा. यानंतर अॅप ओपन करा आणि मोबाईल नंबर अपडेट ऑप्शनवर टॅप करा. येथे ओटीपीच्या माध्यमातून नंबर व्हेरिफाय केला जाईल. यानंतर फेस ऑथेंटिकेशन होईल, ज्यामध्ये अॅप तुमच्या चेहऱ्याला स्कॅन करेल. फेस व्हेरिफिकेशननंतर डेमोग्राफिक अपडेटसाठी 75 रुपये फीस द्यावी लागेल. पेमेंट झाल्यानंतर तुमचा अपडेटेड नंबर डेटाबेसमध्ये सेव्ह होईल.
advertisement









