advertisement

Smartphone : नवीन फोन घेणाऱ्यांसोबत होतोय 'हा' Fraud, स्कॅमर्सनं शोधून काढली नवीन ट्रीक, तुम्ही विकत घेतला असेल तर आताच सावध व्हा

Last Updated:
नव्या फोनच्या उत्साहात आपण एक छोटीशी चूक करतो आणि आपलं संपूर्ण बँक खातं किंवा खासगी डेटा स्कॅमर्सच्या ताब्यात जातो. हा नवा स्कॅम नेमका काय आहे आणि तुम्ही स्वतःला कसं वाचवू शकता? जाणून घ्या सविस्तर.
1/8
नवीन स्मार्टफोन खरेदी करणं हा आपल्यासाठी नेहमीच आनंदाचा क्षण असतो. कष्टाचे पैसे साठवून जेव्हा आपण हातात एक नवीन फोन घेतो, तेव्हा त्याचं फिचर्स तपासण्यात आणि सोशल मीडियावर फोटो टाकण्यात आपण मग्न असतो. पण, तुमचा हाच आनंद आता सायबर चोरांच्या निशाण्यावर आहे. गेल्या काही दिवसांत एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामध्ये लोक जेव्हा नवा फोन खरेदी करतात तेव्हाच काही तासांत किंवा दिवसांत अशा लोकांसोबत सायबर फ्रोड होत असल्याचं समोर आलं आहे. पण असं का होतं?

2/8
नव्या फोनच्या उत्साहात आपण एक छोटीशी चूक करतो आणि आपलं संपूर्ण बँक खातं किंवा खासगी डेटा स्कॅमर्सच्या ताब्यात जातो. हा नवा स्कॅम नेमका काय आहे आणि तुम्ही स्वतःला कसं वाचवू शकता? जाणून घ्या सविस्तर.
नव्या फोनच्या उत्साहात आपण एक छोटीशी चूक करतो आणि आपलं संपूर्ण बँक खातं किंवा खासगी डेटा स्कॅमर्सच्या ताब्यात जातो. हा नवा स्कॅम नेमका काय आहे आणि तुम्ही स्वतःला कसं वाचवू शकता? जाणून घ्या सविस्तर.
advertisement
3/8
1. कसा सुरू होतो हा 'वेलकम' स्कॅम?ठगवण्याची ही पद्धत अत्यंत चालाकीची आहे. तुम्ही फोन खरेदी केल्यानंतर तुम्हाला एक कॉल येतो. फोन करणारा व्यक्ती स्वतःला मोबाईल कंपनीचा कस्टमर केअर एक्झिक्युटिव्ह किंवा बँकेचा अधिकारी असल्याचं सांगतो. तो अतिशय प्रोफेशनल भाषेत बोलतो, ज्यामुळे तुम्हाला संशय येत नाही.
1. कसा सुरू होतो हा 'वेलकम' स्कॅम?ठगवण्याची ही पद्धत अत्यंत चालाकीची आहे. तुम्ही फोन खरेदी केल्यानंतर तुम्हाला एक कॉल येतो. फोन करणारा व्यक्ती स्वतःला मोबाईल कंपनीचा कस्टमर केअर एक्झिक्युटिव्ह किंवा बँकेचा अधिकारी असल्याचं सांगतो. तो अतिशय प्रोफेशनल भाषेत बोलतो, ज्यामुळे तुम्हाला संशय येत नाही. "तुमच्या नवीन फोनचे व्हेरिफिकेशन किंवा ॲक्टिव्हेशन अजून बाकी आहे, जर ते आत्ता केलं नाही तर तुमचा फोन ब्लॉक होईल," अशी भीती तो तुम्हाला घालतो. नवीन फोन बंद पडू नये या भीतीने युझर्स त्यांच्या जाळ्यात अडकतात.
advertisement
4/8
2. तुमचा फोन चोरांच्या हातात कसा जातो?भीती घातल्यानंतर स्कॅमर तुम्हाला एक छोटीशी लिंक पाठवतो किंवा एक 'रिमोट एक्सेस ॲप' (उदा. AnyDesk किंवा TeamViewer) डाऊनलोड करायला सांगतो.
2. तुमचा फोन चोरांच्या हातात कसा जातो?भीती घातल्यानंतर स्कॅमर तुम्हाला एक छोटीशी लिंक पाठवतो किंवा एक 'रिमोट एक्सेस ॲप' (उदा. AnyDesk किंवा TeamViewer) डाऊनलोड करायला सांगतो. "आम्ही इथूनच तुमचा फोन ॲक्टिव्हेट करतो," असं सांगून ते तुमच्या फोनचा ताबा मिळवतात. एकदा का त्यांच्याकडे एक्सेस आला की, ते तुमचे पासवर्ड, बँक डिटेल्स, फोटो आणि वैयक्तिक कागदपत्रे सहज चोरू शकतात. काही प्रकरणांमध्ये तर फोन पूर्णपणे लॉक करून तुमच्याकडे पैशांची मागणीही केली जाते.
advertisement
5/8
3. 'या' धोक्याच्या घंटा ओळखात्वरीत निर्णय घेण्याचा दबाव :
स्कॅमर्स नेहमी तुम्हाला घाई करतात.
3. 'या' धोक्याच्या घंटा ओळखात्वरीत निर्णय घेण्याचा दबाव :स्कॅमर्स नेहमी तुम्हाला घाई करतात. "आत्ताच करा, नाहीतर फोन बंद होईल," असं म्हणणं ही त्यांची पहिली चाल असते.
advertisement
6/8
OTP किंवा कोडची मागणी:कोणतीही अधिकृत कंपनी फोनवर तुमचा ओटीपी किंवा सिक्युरिटी कोड मागत नाही. अनोळखी ॲप्स: जर कोणी तुम्हाला फोनवरून एखादं ॲप इन्स्टॉल करायला सांगत असेल, तर ती धोक्याची घंटा आहे.

7/8
4. स्वतःला सुरक्षित कसं ठेवावं?अनोळखी कॉलवर विश्वास ठेवू नका: कंपनीला काही व्हेरिफिकेशन करायचं असेल, तर ते अधिकृत ई-मेल किंवा मेसेजद्वारे कळवतात. फोनवर कोणतीही माहिती देऊ नका. अधिकृत केंद्राला भेट द्या: जर तुम्हाला खरंच शंका असेल, तर जवळच्या अधिकृत सर्व्हिस सेंटरला प्रत्यक्ष भेट द्या. ॲप्स तपासल्याशिवाय घेऊ नका: केवळ गुगल प्ले स्टोअर किंवा ॲपल ॲप स्टोअरवरूनच अधिकृत ॲप्स डाऊनलोड करा. तुमच्या फोनचे सॉफ्टवेअर नेहमी अपडेट ठेवा, कारण त्यात नवीन सुरक्षा फिचर्स असतात.

8/8
तंत्रज्ञान जितकं प्रगत होतंय, तितकेच सायबर चोरही हुशार होत आहेत. तुमचा नवा फोन तुमच्यासाठी आनंदाचा स्रोत असावा, डोकेदुखीचा नाही. त्यामुळे कोणताही संशयास्पद कॉल आल्यास तो लगेच कट करा. तुमची थोडीशी सतर्कता तुम्हाला मोठ्या आर्थिक नुकसानीपासून वाचवू शकते.

Maharashtra Kesari : दोनदा गदा मिळाली पण इच्छा अपूर्णच राहिली, विजयानंतर हर्षवर्धनने मनातली खदखद बोलून दाखवली
दोनदा गदा मिळाली पण इच्छा अपूर्णच राहिली, विजयानंतर हर्षवर्धनने मनातली खदखद बोलून दाखवली
  • हर्षवर्धनने मनातली खदखद बोलून दाखवली

  • विजयानंतर इच्छा अपूर्णच

  • पहिली प्रतिक्रिया काय?

View All
advertisement