Pune Crime : उरुळी कांचन हुंडाबळी प्रकरणात मोठा ट्विस्ट! सरपंच सासूची एक अट ठरली इंजिनियर सुनेच्या मृत्यूचं कारण!
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Uruli Kanchan dowry death case : दीप्ती मगर चौधरी या विवाहितेचं नाव असून तिनं इंजीनियरिंगचं शिक्षण पूर्ण केलं. लग्नानंतर काही वर्ष चांगली गेल्यानंतर सासरच्या लोकांनी आपले खरे रंग दाखवले.
Pune Crime News : पुण्यातील वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणानंतर आता उरुळी कांचनमधून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आणखी एका विवाहित तरुणीला हुंडाबळीला सामोरं जावं लागलं अन् तिने अखेर टोकाचं पाऊल उचलत आत्महत्या केली. पेशाने इंजिनियर असलेल्या विवाहितेनं आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आल्याने संपूर्ण उरुळी कांचनमध्ये मोठी खळबळ उडाल्याचं पहायला मिळतंय. विवाहिची सासू सरपंच तर सासरे शिक्षक असल्याची माहिती देखील मिळाली आहे.
दिप्ती अचानक मोठ्याने रडू लागली...
दीप्ती मगर चौधरी या विवाहितेचं नाव असून तिनं इंजीनियरिंगचं शिक्षण पूर्ण केलं. लग्नानंतर काही वर्ष चांगली गेल्यानंतर सासरच्या लोकांनी आपले खरे रंग दाखवले. दीप्तीच्या वडिलांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार, मी दिप्तीला तू खूपचं नाराज दिसत आहे असं विचारलं तेव्हा तिने मोठ्याने रडू लागली, असं तिच्या वडिलांनी सांगितलं. त्यावेळी विश्वासात घेऊन तिला सगळा घटनाक्रम विचारला तेव्हा तिने सांगितलं की, माझ्या इच्छेविरुद्ध माझा गर्भपात केला गेला. आधीच मुलगी असल्याने सासू आणि नवऱ्याने बळजबरीने चाचणी करायला लावली. त्यावेळी तपासणीत दुसरी देखील मुलगी असल्याचं दिसून आलं. त्यावेळी सासूने जबरदस्तीने माझा गर्भपात करून घेतला, अशी कैफियत दिप्तीने वडिलांसमोर मांडली.
advertisement
आमच्या वंशाला दिवा हवाय
मुलाच्या हव्यासापोटी दिप्तीवर आपल्याच बाळाच्या विरोधात जाण्यासाठी दबाव टाकला जात होता. आम्हाला आमच्या वंशाला दिवा हवा आहे, तू तपासणी करणार नसशील तर आमच्या घरातून चालती हो, असं माझ्या सासुने मला म्हटलं होतं. तसेच घरी काही सांगू नको, असा दबाव देखील टाकला होता, असं दिप्तीने वडिलांना सांगितलं. मात्र, मी तिला समजवून शांत केलं अन् तिला समजवून सांगितलं, असं तिच्या वडिलांनी म्हटलं आहे.
advertisement
50 तोळे सोने, 25 लाख रुपये
दरम्यान, दिप्ती हिला चारचाकी गाडी घेण्यासाठी माहेरून हुंड्याची मागणी करून वेळोवेळी पैसे आणण्यासाठी मागणी केली, पैसे घेवून त्रास दिला. या प्रकरणी सासू आणि पतीला पोलिसांनी अटक केली आहे. 2019 ला यांचा विवाह झाला होता लग्नामध्ये 50 तोळे सोने देण्यात आले होते. तरी देखील तुला काही करताच येत नाही. तुला जमतंच नाही, असा त्रास तिला दिला जात होता. मुलीचा संसार चांगला व्हावा यासाठी तिच्या सासरच्यांना एकदा 10 लाख रुपये कॅश, गाडी घेण्यासाठी 25 लाख रुपये देण्यात आले होते.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Jan 27, 2026 11:52 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
Pune Crime : उरुळी कांचन हुंडाबळी प्रकरणात मोठा ट्विस्ट! सरपंच सासूची एक अट ठरली इंजिनियर सुनेच्या मृत्यूचं कारण!









