advertisement

पुण्यात पहाटे रक्तरंजित थरार, आईनं मुलाचा चिरला गळा, मुलीवरही वार

Last Updated:

पुण्याच्या वाघोली परिसरातून एक मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. इथं एका महिलेनं स्वतःच्या पोटच्या ११ वर्षांच्या मुलाचा गळा चिरून खून केला आहे.

News18
News18
पुण्याच्या वाघोली परिसरातून एक मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. इथं एका महिलेनं स्वतःच्या पोटच्या ११ वर्षांच्या मुलाचा गळा चिरून खून केला आहे. तिने आपल्या १३ वर्षांच्या मुलीवरही प्राणघातक हल्ला केला. मात्र ती थोडक्यात बचावली आहे. मंगळवारी पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. एका आईनेच आपल्या दोन मुलांवर अशाप्रकारे हल्ला केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

नेमकं प्रकरण काय?

मिळालेल्या माहितीनुसार, ही भयंकर घटना वाघोली परिसरात उघडकीस आली आहे. एका आईने आपल्या ११ वर्षांच्या मुलाची धारदार शस्त्राने गळा चिरून हत्या केली. एवढ्यावरच न थांबता तिने आपल्या १३ वर्षांच्या मुलीलाही संपवण्याचा प्रयत्न केला. मात्र, मुलीने प्रसंगावधान राखत आरडाओरडा केल्यामुळे तिचा जीव थोडक्यात वाचला आहे.
हा सर्व प्रकार पहाटेच्या शांततेत घडला. घरात सर्वजण झोपलेले असताना आरोपी आईने अचानक हे टोकाचे पाऊल उचलले. तिने धारदार शस्त्राने ११ वर्षांच्या मुलावर हल्ला केला, ज्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर तिने आपल्या १३ वर्षांच्या मुलीवरही वार करण्यास सुरुवात केली.
advertisement
आई आपल्यावर हल्ला करत असल्याचे पाहून मुलगी प्रचंड घाबरली, मात्र तिने स्वतःचा जीव वाचवण्यासाठी घराबाहेर पळ काढला. तिने आरडाओरडा करून शेजाऱ्यांना मदतीसाठी बोलावले. मुलीचा आवाज ऐकून शेजारी तातडीने मदतीला धावून आले, ज्यामुळे तिचे प्राण वाचू शकले. जखमी मुलीला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिच्यावर उपचार सुरू आहेत.

हत्येचे कारण अस्पष्ट

advertisement
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपी आईला ताब्यात घेतले आहे. एका आईने आपल्याच मुलांचा जीव घेण्याचा प्रयत्न का केला? याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. हा प्रकार कौटुंबिक वादातून घडला की आई मानसिक तणावाखाली होती, याचा तपास पोलीस करत आहेत. वाघोली सारख्या अत्यंत गजबजलेल्या परिसरात घडलेल्या या थरारक घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
पुण्यात पहाटे रक्तरंजित थरार, आईनं मुलाचा चिरला गळा, मुलीवरही वार
Next Article
advertisement
Gold Price : सोनं १६०००० रुपयांच्या पार! आता खरेदी करणं शहाणपणाचं की ठरेल घाई? पाहा काय म्हणतात एक्सपर्ट
सोनं १६०००० रुपयांच्या पार! आता खरेदी करणं शहाणपणाचं की ठरेल घाई? पाहा काय म्हणत
  • मागील काही दिवसांपासून सोनं-चांदीच्या दरात मोठ्या प्रमाणावर तेजी दिसून आली आहे

  • सोनं-चांदीच्या दराने ऑलटाइम हाय गाठला आहे.

  • आता सोनं खरेदी करावं की थोडं थांबावं असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

View All
advertisement