महिन्याअखेरीस पावसाची सरप्राइज एन्ट्री; ठाण्यासह 4 जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट, अचानक कसा आला पाऊस? स्कायमेटनं उत्तर
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
उत्तर महाराष्ट्र, नाशिक परिसरात वेस्टर्न डिस्टरबन्समुळे ढगाळ वातावरण व अवकाळी पावसाचा अलर्ट. नंदुरबार, धुळे, जळगाव जिल्ह्यांत पावसाची शक्यता, शेतकरी सतर्क.
गेल्या दोन दिवसांपासून महाराष्ट्रातील अनेक भागांत, विशेषतः उत्तर महाराष्ट्र आणि नाशिक परिसरात अचानक ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. कडाक्याच्या थंडीची अपेक्षा असताना अचानक आलेल्या या अवकाळी' वातावरणामुळे शेतकरी चिंतेत पडले आहेत. उत्तर भारतात आलेल्या एका शक्तिशाली वेस्टर्न डिस्टरबेंसमुळे हे बदल होत असून, त्याचे पडसाद आता महाराष्ट्रातही उमटत आहेत.
२३ जानेवारीपासून देशभरात पुन्हा अवकाळी पावसानं धुमाकूळ घातला आहे. उत्तर भारत आणि राजस्थानमध्ये गारपिटीसह पाऊस झाला. दक्षिणेकडेही पाऊस पडला आहे. आता एक नवीन वेस्टर्न डिस्टर्बन्स तयार झाला आहे. त्यामुळे त्याचा परिणाम भारतावर होणार आहे.
याचा परिणाम पुढचे 48 तास स्नोफॉल होईल आणि उत्तर भारतात पाऊस राहील. तर अरबी समुद्रातून येणाऱ्या खाऱ्या वाऱ्यांमुळे हवामानात मोठे बदल झाले आहेत. छत्तीसगडच्या आसपास वादळाची स्थिती तयार झाली आहे. त्यामुळे दोन्हीकडून येणाऱ्या वाऱ्यांचा परिणाम महाराष्ट्रावर होत आहे. महाराष्ट्रात आज आणि उद्या दोन दिवस ढगाळ वातावरणासह पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे.
advertisement
महाराष्ट्रात देखील कोकण, मुंबई उपनगर, ठाण्यात यलो अलर्ट देण्यात आला आहे. जळगाव, नंदुरबार, धुळे या जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा देण्यात आला आहे. आज आणि उद्या दोन दिवस अचानक होणाऱ्या अवकाळी पावसामुळे तापमानात वाढ होणार आहे. 28 जानेवारी रोजी वेस्टर्न डिस्टर्बन्स जेव्हा पुढे सरकेल तेव्हा पुन्हा तापमानात घट होण्याची शक्यता आहे. उत्तरेकडून येणाऱ्या गार वाऱ्यांमुळे पुन्हा एकदा कडाक्याची थंडी वाढणार आहे.
advertisement
अचानक पाऊस का पडतोय?
स्कायमेटचे हवामान तज्ज्ञ महेश पलावत यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या हिमालयावर एक नवीन आणि तीव्र वेस्टर्न डिस्टरबन्स धडकला आहे. याच्या प्रभावामुळे पाकिस्तान आणि राजस्थानच्या दरम्यान एक चक्रीय वातस्थिती निर्माण झाली आहे. ही यंत्रणा अरबी समुद्रातून बाष्पयुक्त वारे खेचून घेत आहे. हे ओलावा असलेले वारे आणि उत्तरेकडून येणारे थंड वारे यांचा संगम झाल्यामुळे राजस्थान, गुजरात आणि महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागांत ढग दाटून येत आहेत. याच कारणामुळे नंदुरबार, धुळे, जळगाव आणि नाशिक जिल्ह्यांत पावसाची ५०-५० टक्के शक्यता निर्माण झाली आहे.
advertisement
उत्तर भारतात बर्फवृष्टी, महाराष्ट्रात ढगाळ वातावरण
२७ जानेवारी रोजी उत्तर भारतात जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये जोरदार हिमवर्षाव सुरू झाला आहे. या बर्फवृष्टीचा परिणाम म्हणून वाऱ्याची दिशा बदलली असून, त्याचा प्रभाव मध्य भारतापर्यंत पोहोचला आहे. महाराष्ट्रातील खालील जिल्ह्यांवर याचा परिणाम दिसून येईल. उत्तर महाराष्ट्रात नंदुरबार, धुळे आणि जळगावमध्ये हलक्या पावसाची किंवा रिमझिम होण्याची शक्यता आहे. नाशिक आणि अहमदनगरच्या काही भागांत ढगाळ वातावरण राहील.
advertisement
तापमानाचा चढ-उतार आणि 'पाला' पडण्याचा धोका
पुढील ४८ तासांत महाराष्ट्रात ढगाळ वातावरणामुळे किमान तापमानात थोडी वाढ होईल, ज्यामुळे थंडी कमी झाल्यासारखी वाटेल. मात्र, २८ जानेवारीच्या संध्याकाळनंतर हा वेस्टर्न डिस्टरबन्स पुढे निघून गेल्यावर पुन्हा एकदा उत्तरेकडून थंड वारे वाहू लागतील. यामुळे २९ जानेवारीपासून महाराष्ट्रात पुन्हा एकदा कडाक्याची थंडी परतेल. उत्तर भारतात ओले पडण्याची (Hailstorm) शक्यता असल्याने, त्याचा गारवा महाराष्ट्रातील थंडी अधिक तीव्र करेल.
advertisement
शेतकऱ्यांसाठी सल्ला
अचानक येणाऱ्या या ढगाळ वातावरणामुळे द्राक्ष, कांदा आणि रब्बी पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी हवामानाचा अंदाज घेऊनच फवारणीचे नियोजन करावे, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात येत आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 27, 2026 11:25 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
महिन्याअखेरीस पावसाची सरप्राइज एन्ट्री; ठाण्यासह 4 जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट, अचानक कसा आला पाऊस? स्कायमेटनं उत्तर









