advertisement

Weather Alert: जानेवारी अखेर वारं फिरलं, कल्याण-डोंबिवलीच्या हवामानात मोठे बदल, IMD चा अलर्ट

Last Updated:
Weather Alert: महाराष्ट्रासह मुंबई आणि ठाण्यातील हवामानात मोठे बदल जाणवत आहेत. कल्याण-डोंबिवलीतील हवामान अपडेट जाणून घेऊ.
1/5
राज्यातील हवामानात काही दिवसांपासून सातत्याने बदल होताना दिसत आहेत. उत्तर महाराष्ट्रासह राज्यात हलक्या पावसाची शक्यता आहे. तर काही ठिकाणी ढगाळ वातावरणासह सकाळी धुके आणि दुपारनंतर उन्हाचे चटके सहन करावे लागतील. मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात किमान तापमानात किंचित घट होऊन सकाळी उशिरापर्यंत हलके धुके राहू शकते. 27 जानेवारी रोजी कल्याण डोंबिवलीसह इतर भागातील हवामान अंदाज जाणून घेऊ.

2/5
कल्याण तालुक्यात हवामान मुख्यत्वे कोवळे ऊन आणि अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. कमाल तापमान 30-33 अंश सेल्सिअस तर किमान 19- 21 अंश सेल्सिअसच्या आसपास राहू शकते. वाऱ्याचा वेग मध्यम असल्याने दुपारी उष्णतेची जाणीव तर सकाळ व संध्याकाळ हलकी थंडी जाणवू शकते.

3/5
डोंबिवली शहरातील हवामान अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता असून, थंडीचे प्रमाण कमी राहील. किमान तापमान 18 अंश सेल्सिअस तर कमाल 30 अंश सेल्सिअस असेल. तापमानाचा पारा (कमाल व किमान) सामान्यपेक्षा किंचित वर राहण्याचा अंदाज आहे. दिवसा उष्णता आणि पहाटे हलकी थंडी अनुभवायला मिळेल.

4/5
कल्याण-डोंबिवली ग्रामीण भागात हवामान सुखद आणि अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. किमान तापमान 18 अंश सेल्सिअस तर कमाल 32 अंश सेल्सिअस राहील. दिवसा हवामान सामान्यत: उष्ण व कोरडे, तर रात्री सुखद थंडी जाणवेल. हवामानातील बदलांमुळे नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी, असा सल्ला हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.

5/5
बदलापूर शहरातील हवामान मुख्यतः कोरडे आणि अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. किमान तापमान 12 अंश तर कमाल 25 अंश सेल्सिअस राहील. दिवसा हलके वारे वाहतील. तर शहापूर व मुरबाड तालुक्यातील वाऱ्याचा वेग सौम्य असल्याने किमान तापमान 15-18 अंश सेल्सिअस आणि कमाल तापमान 30-32 अंश सेल्सिअस राहील. हवामान बदलामुळे नागरिकांना आरोग्याची काळजी घ्यावी लागेल.

Gold Silver Price:  ट्रम्प यांची एक धमकी अन् बाजारात उलथापालथ, सोन्यानं गाठला रेकोर्ड ब्रेक दर, चांदीही महागली, एक्सपर्ट म्हणतात, 'आता...'
ट्रम्प यांची एक धमकी अन् बाजारात उलथापालथ, सोन्यानं गाठला रेकोर्ड ब्रेक दर, चां
  • मागील काही दिवसांपासून सोनं-चांदीच्या दरात तुफान तेजी आली आहे.

  • सोनं-चांदीचे दर नवीन उच्चांक गाठत आहेत.

  • आज, जागतिक बाजारपेठेत सध्या सोन्याने सर्व रेकॉर्ड मोडीत काढले आहेत.

View All
advertisement