advertisement

Loan वर घर घरेदी करताय का? मग ही रिस्क अजिबात घेऊ नका,अन्यथा नुकसान होणारच

Last Updated:

Home Loan : अन्न, वस्त्र आणि निवारा या मानवी जीवनातील तीन अत्यावश्यक गरजा मानल्या जातात. अन्न आणि कपड्यांची उपलब्धता आजही बहुतेकांना शक्य होते.

Property Rules
Property Rules
मुंबई : अन्न, वस्त्र आणि निवारा या मानवी जीवनातील तीन अत्यावश्यक गरजा मानल्या जातात. अन्न आणि कपड्यांची उपलब्धता आजही बहुतेकांना शक्य होते, मात्र स्वतःचे घर खरेदी करणे दिवसेंदिवस सर्वसामान्यांसाठी अधिक कठीण होत चालले आहे. वाढत्या महागाईसोबतच रिअल इस्टेट क्षेत्रातही मोठे बदल होत असून, विकासकांचा कल आता परवडणाऱ्या घरांपेक्षा आलिशान आणि महागड्या प्रकल्पांकडे वाढलेला दिसत आहे.
परवडणारी घरे का कमी होत आहेत?
साधारणपणे ४५ लाख रुपयांपर्यंत किमतीची घरे ‘परवडणारी घरे’ या श्रेणीत येतात. मात्र अशा प्रकल्पांमध्ये विकासकांना केवळ १० ते १२ टक्क्यांपर्यंतच नफा मिळतो. याउलट आलिशान घरांच्या प्रकल्पांमध्ये २५ ते ३० टक्क्यांपर्यंत नफा मिळत असल्याने बहुतांश बिल्डर महागड्या घरबांधणीकडे वळत आहेत. याचा थेट परिणाम मध्यमवर्गीय आणि पहिल्यांदा घर घेणाऱ्यांवर होत आहे.
advertisement
घर खरेदीपूर्वी आर्थिक गणित समजून घ्या
सध्या अनेक कुटुंबांमध्ये घरकर्जाचा ईएमआय उत्पन्नाच्या तब्बल ६० टक्क्यांपर्यंत पोहोचलेला आहे. त्यामुळे घर खरेदी करण्याआधी स्वतःची आर्थिक क्षमता तपासणे अत्यंत गरजेचे ठरते. केवळ भावनांच्या भरात निर्णय न घेता, नियम, कर्जाची पात्रता आणि करसवलती यांची सखोल माहिती घेणे आवश्यक आहे.
होम लोनसाठी पात्रता कशी ठरते?
घर खरेदीचा विचार करत असाल, तर सर्वप्रथम होम लोनसाठी आपण पात्र आहोत की नाही हे तपासावे लागते. यामध्ये तुमचे मासिक उत्पन्न, इतर चालू ईएमआय, मासिक खर्च आणि सिबिल स्कोअर या गोष्टी महत्त्वाच्या ठरतात. बँक किंवा वित्तसंस्था तुमच्या आर्थिक स्थैर्यावर समाधानी असतील आणि सिबिल स्कोअर चांगला असेल, तरच गृहकर्ज मंजूर होण्याची शक्यता असते.
advertisement
गृहकर्जावर आयकरात किती फायदा?
नवीन कर प्रणाली अंतर्गत १२ लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त झाल्याने अनेक करदाते आता जुन्या कर प्रणालीऐवजी नवीन प्रणालीकडे वळताना दिसत आहेत. मात्र यामुळे गृहकर्जावर मिळणाऱ्या करसवलतींबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. नवीन कर प्रणालीमध्ये गृहकर्जावरील अनेक सवलती लागू होत नाहीत, हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे.
कलम 24(ब) अंतर्गत तरतूद
आयकर कायद्यातील कलम 24(ब) अंतर्गत गृहकर्जावरील व्याजावर करसूट मिळण्याची तरतूद आहे. ही वजावट ‘घराच्या मालमत्तेतून मिळणारे उत्पन्न’ या शीर्षकाखाली येते. जर घर भाड्याने दिले असेल, तर मिळणाऱ्या भाडे उत्पन्नाच्या मर्यादेपर्यंत व्याजावर करसवलत घेता येते.
advertisement
स्वतः राहणाऱ्या घराला करसूट का नाही?
जर तुम्ही गृहकर्ज घेऊन बांधलेल्या किंवा खरेदी केलेल्या घरात स्वतः राहत असाल, तर नवीन कर प्रणाली अंतर्गत कलम 24(ब) मधील करसवलतीचा लाभ घेता येत नाही. मात्र घर भाड्याने दिल्यास, मिळणाऱ्या भाड्याएवढ्या व्याजरकमेपर्यंतच कर कपातीचा दावा करता येतो.
उदाहरणातून समजून घ्या
समजा तुमच्या गृहकर्जावरील वार्षिक व्याज ५ लाख रुपये आहे आणि भाड्यापोटी मिळणारे उत्पन्न ४ लाख रुपये आहे. अशा परिस्थितीत तुम्ही फक्त ४ लाख रुपयांपर्यंतच कर कपातीचा दावा करू शकता. उरलेल्या १ लाख रुपयांच्या व्याजाचा तोटा पगाराच्या उत्पन्नातून वजा करता येत नाही किंवा पुढील वर्षासाठी कॅरी फॉरवर्डही करता येत नाही.
advertisement
एकूणच, घर खरेदी हा आयुष्यातील मोठा आर्थिक निर्णय आहे. त्यामुळे केवळ घराचे स्वप्न न पाहता, त्यामागील आर्थिक वास्तव, कर्जाची जबाबदारी आणि कर नियम यांचा समतोल विचार करूनच पुढचे पाऊल टाकणे शहाणपणाचे ठरेल.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Loan वर घर घरेदी करताय का? मग ही रिस्क अजिबात घेऊ नका,अन्यथा नुकसान होणारच
Next Article
advertisement
Gold Price : सोनं १६०००० रुपयांच्या पार! आता खरेदी करणं शहाणपणाचं की ठरेल घाई? पाहा काय म्हणतात एक्सपर्ट
सोनं १६०००० रुपयांच्या पार! आता खरेदी करणं शहाणपणाचं की ठरेल घाई? पाहा काय म्हणत
  • मागील काही दिवसांपासून सोनं-चांदीच्या दरात मोठ्या प्रमाणावर तेजी दिसून आली आहे

  • सोनं-चांदीच्या दराने ऑलटाइम हाय गाठला आहे.

  • आता सोनं खरेदी करावं की थोडं थांबावं असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

View All
advertisement