advertisement

ब्रँडेड दारू पिताय? ही बातमी वाचाल तर दारूचा नाद सोडाल, कल्याणमध्ये धक्कादायक प्रकार

Last Updated:

Kalyan News: कल्याणमध्ये अबकारी विभागाने टिटवाळा परिसरातील एका घरावर छापा टाकला. यामध्ये धक्कादायक प्कार पुढे आला आहे.

ब्रँडेट दारू पिताय? ही बातमी वाचाल तर दारूचा नाद सोडाल, कल्याणमध्ये धक्कादायक प्रकार
ब्रँडेट दारू पिताय? ही बातमी वाचाल तर दारूचा नाद सोडाल, कल्याणमध्ये धक्कादायक प्रकार
कल्याण: महाराष्ट्रात दारू पिणाऱ्यांची कमी नाही. व्यसनाच्या आहारी गेल्याने काहीजण कसलीही दारू पितात. तर काहींची ब्रँड आणि चांगल्या दर्जाच्या मद्याला पसंती असते. मात्र, हेच ब्रँड म्हणवलं जाणारं मद्य देखील बनावट आणि धोकादायक असू शकतं. कल्याणमध्ये विदेशी ब्रँडेड बाटल्यांत बनावट दारू भरणाऱ्या टोळीला पकडण्यात आलंय. अबकारी विभागाच्या या कारवाईतून धक्कादायक प्रकार पुढे आला आहे.
कल्याणजवळील टिटवाळा परिसरात विदेशी मद्याच्या बाटल्यांतून मद्य काढून त्यात बनावट दारू भरली जात होती. कल्याणच्या अबकारी विभागाच्या पथकाने टिटवाळा मांडा परिसरातील एका घरावर छापा टाकला. तेव्हा घरामध्ये हा गैरप्रकार सुरू होता. भरारी पथकाने बनावट मद्यसाठ्यासह एकूण 12 लाख 5 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तर या प्रकरणी जयश्री केणे व रोहन केणे या दोघांना बेड्या ठोकण्यात आल्या. जयेश केणे यांच्या घरात हा कारखाना सुरू होता.
advertisement
भरारी पथकाला मांडा टिटवाळा परिसरात मुंबई बडोदा प्रस्तावित हायवेवर बनावट मद्याचा साठा घेऊन एक गाडी येणार असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीनुसार भरारी पथकाचे दीपक परब यांनी आपल्या कर्मचाऱ्यांसह सापळा रचला. एक संशयित गाडी येताच या पथकाला संशय आला त्यांनी ही गाडी थांबवून चौकशी केली. तेव्हा गाडीमध्ये विदेशी मद्यसाठा आढळून आला.
advertisement
अबकारी विभागाच्या भरारी पथकाने तत्काळ चालक रोहन केणे याला ताब्यात घेत चौकशी केली. तेव्हा बनावट दारू टिटवाळा मांडा परिसरात बनवत असल्याचे सांगितले. त्यानुसार पथकाने मांडा टिटवाळा परिसरातील जयेश केणे यांच्या घरी छापा टाकला. त्याच्या घरात बनावट बुच, प्लास्टिक जार, बनावट विदेशी मद्य, विविध ब्रँडच्या रिकाम्या काचेच्या बाटल्या, असं साहित्य आढळलं. पथकाने तत्काळ हे सगळं साहित्य जप्त केले असून दोघांना अटक केली.
advertisement
दरम्यान, बनावट दारू शहरातील ढाब्यांवर जात असल्याचा दाट संशय अबकारी विभागाला असून त्या दृष्टीने पुढील तपास सुरू आहे.
view comments
मराठी बातम्या/Kalyan Dombivli/
ब्रँडेड दारू पिताय? ही बातमी वाचाल तर दारूचा नाद सोडाल, कल्याणमध्ये धक्कादायक प्रकार
Next Article
advertisement
Eknath Shinde: महापालिका निकालानंतर महायुतीत बिनसलं? एकनाथ शिंदेंची सलग दुसऱ्या कॅबिनेट बैठकीला दांडी, नेमकं कारण आलं समोर
महापालिका निकालानंतर महायुतीत बिनसलं? शिंदेंची सलग दुसऱ्या कॅबिनेटला दांडी,
  • राज्याच्या राजकीय वर्तुळात महापालिका निवडणुकीनंतर मोठ्या घडामोडी सुरू आहेत.

  • आज होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गैरहजर राहणा

  • मागील बैठकीतही एकनाथ शिंदे हे अनुपस्थित होते.

View All
advertisement