झोपण्याची आणि उठण्याची योग्य वेळ कोणती?
हेल्थलाइनच्या अहवालानुसार, रात्री लवकर झोपणे हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. आरोग्य चांगले राहण्यासाठी प्रत्येकाने 7 ते 8 तासांची गाढ झोप घ्यावी. जे लोक रात्री लवकर झोपतात, ते सकाळी लवकर उठतात. यामुळे शरीराची बायोलॉजिकल क्लॉक (सर्केडियन रिदम) योग्य राहते आणि विविध आजारांचा धोका कमी होतो. मात्र, ज्या लोकांचे नोकरीचे वेळापत्रक रात्री उशिरापर्यंत असते, त्यांच्यासाठी महत्त्वाचे म्हणजे त्यांनी कोणत्याही परिस्थितीत 7-8 तासांची झोप घ्यावी.
advertisement
झोपण्याची आणि उठण्याची सर्वोत्तम वेळ
- संशोधनानुसार, रात्री 10 ते 11 च्या दरम्यान झोपणे आणि सकाळी 5 ते 6 च्या दरम्यान उठणे आरोग्यासाठी योग्य मानले जाते.
- जे लोक त्यापूर्वी झोपतात, ते सकाळी 4 वाजताही उठू शकतात.
- झोपण्याच्या वेळेपेक्षा दररोज एकाच वेळी झोपणे आणि उठणे अधिक महत्त्वाचे आहे.
अपुरी झोप आरोग्यासाठी घातक का?
- थकवा आणि आळस – सकाळी फ्रेश वाटत नाही, दिवसभर ऊर्जा कमी वाटते.
- चिडचिड आणि एकाग्रतेचा अभाव – कमी झोपेमुळे मानसिक तणाव वाढतो.
- स्मरणशक्ती कमजोर होते – अपुरी झोप मेंदूच्या कार्यक्षमतेवर परिणाम करते.
- हृदयरोगाचा धोका – झोप कमी झाल्यास उच्च रक्तदाब आणि हृदयविकार होण्याची शक्यता वाढते.
- मधुमेह आणि लठ्ठपणाचा धोका – शरीरातील चयापचय बिघडतो, वजन वाढू शकते.
- डिप्रेशन आणि तणाव – मानसिक आरोग्यावर वाईट परिणाम होतो.
सकाळी लवकर उठण्याचे फायदे
- शरीरात एनर्जी आणि ताजेतवानेपणा राहतो.
- पचनतंत्र सुधारते आणि रोगप्रतिकारशक्ती वाढते.
- व्यायाम करण्यासाठी आणि स्वत:साठी वेळ मिळतो.
- दिवसभर सकारात्मक विचार आणि कार्यक्षमतेत वाढ होते.
नियमित 7-8 तासांची झोप घेणे आणि ठराविक वेळी झोपून उठणे हे आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. रात्री 10 ते 11 वाजता झोपून सकाळी 5 ते 6 दरम्यान उठल्यास शरीर आणि मन दोन्ही तंदुरुस्त राहते. जर अपुरी झोप होत असेल, तर त्याचा गंभीर परिणाम आरोग्यावर होऊ शकतो. म्हणूनच, नियमित आणि पुरेशी झोप घ्या आणि निरोगी जीवनशैली स्वीकारा.
हे ही वाचा : गायीच्या शेपटीच्या केसांपासून पितृ दोष-कालसर्प दोषातून मिळते मुक्ती! जाणून घ्या, त्याचे इतरही फायदे...
हे ही वाचा : हिंदू धर्मात विवाहाचे 8 प्रकार! कोणता विवाह आहे सर्वश्रेष्ठ? आचार्य सांगतात, 'लव्ह मॅरेजबद्दल तर...'
