TRENDING:

लहान मुलं असतात नाजूक, त्यांना थंडीत कसं जपावं? आयुर्वेद सांगतं...

Last Updated:

लहान मुलांचे खाण्यावरून खूप हट्ट असतात. परंतु ते नाजूक असल्यामुळे त्यांच्या शरिरात सकस आहार जाणं अत्यंत महत्त्वाचं असतं.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
अभिनव कुमार, प्रतिनिधी
हिवाळ्यात लहान मुलांचीच नाही, तर आपली स्वतःचीदेखील काळजी घेणं आवश्यक असतं.
हिवाळ्यात लहान मुलांचीच नाही, तर आपली स्वतःचीदेखील काळजी घेणं आवश्यक असतं.
advertisement

दरभंगा, 15 डिसेंबर : गुलाबी थंडी कोणाला नाही आवडत. परंतु थंडीसोबत येणाऱ्या साथीच्या आजारांनी अगदी नकोसं होतं. त्यात लहान मुलांची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत असते. त्यामुळे त्यांना हवामान बदलाने होणाऱ्या आजारांपासून विशेष जपावं लागतं. सर्दी, खोकला आणि तापापासून आपल्या मुलांची काळजी कशी घ्यावी, याचे काही घरगुती उपाय पाहूया.

बिहारच्या दरभंगातील आयुर्वेदिक मेडिकल कॉलेजचे प्राचार्य डॉ. शंभू शरण यांनी दिलेल्या माहितीनुसार, लहान मुलांचे खाण्यावरून खूप हट्ट असतात. परंतु ते नाजूक असल्यामुळे त्यांच्या शरिरात सकस आहार जाणं अत्यंत महत्त्वाचं असतं. शिवाय थंडीत त्यांना अंगभर गरम कपडे घालावे. जेणेकरून त्यांचं शरीर उबदार राहील आणि त्यांना थंडीचा त्रास होणार नाही.

advertisement

महागडं केशरही असू शकतं बनावट, पण ओळखणं इतकंही नाही कठीण!

मुलांना खोकला झाला असल्यास त्यांना सकाळ-संध्याकाळ अर्धा चमचा मध द्यावं. हे मध भेसळयुक्त नाही ना याची काळजी घ्यावी. खोकला वाढला तर मधात तुळशीपत्र घालावं. तरीही आराम नाही मिळाला, तर त्यात वाटलेली काळीमिरी घालावी. या उपायाने खोकल्यापासून नक्कीच आराम मिळेल.

advertisement

पार्कमध्ये वाटतं खूप थंड? Don't worry घरीच करा 'ही' आसनं

दरम्यान, हिवाळ्यात लहान मुलांचीच नाही, तर आपली स्वतःचीदेखील काळजी घेणं आवश्यक असतं. आपला आहार सकस असेल आणि जीवनसत्त्व, पौष्टिक गुणांनी परिपूर्ण असेल, याची काळजी घ्यावी. शिवाय दररोज व्यायाम करावा.

लेटेस्ट बातम्या आणि व्हिडीओ पाहण्यासाठी न्यूज18 लोकमतच्या या अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला करा फॉलो...या लिंकवर क्लिक करा https://whatsapp.com/channel/0029Va7W4sJI7BeETxLN6L0g

advertisement

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
लहान मुलं असतात नाजूक, त्यांना थंडीत कसं जपावं? आयुर्वेद सांगतं...
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल