१. लवंग
खोकल्याचा त्रास होत असेल तर लवंग वापरु शकता. कारण लवंगेमध्ये असलेले औषधी गुणधर्म खोकल्याचा त्रास कमी करतात. मंद आचेवर लवंग भाजून घ्या, त्याची पूड करा. यामध्ये थोडा मध घाला. हे मिश्रण खाल्ल्यानं तुमचा खोकल्याचा त्रास कमी होऊ शकतो.
Weight loss 5:2 pattern : वजन कमी करण्यासाठी वापरा हा प्लान, चरबी होईल कमी
advertisement
२. मध
प्रतिजैविक असलेल्या मधामुळे, खोकला कमी होतो. १-२ चमचे मध खा आणि त्यावर कोमट पाणी प्या.
घशाला आराम मिळतो आणि खोकला कमी होतो.
३.आलं
खोकल्याच्या समस्येवरही आलं खूप फायदेशीर आहे. यामुळे स्नायूंना आराम मिळतो आणि श्वसनमार्ग स्वच्छ होतो. आल्यामध्ये दाहक-विरोधी गुणधर्म असतात ज्यामुळे घशाचा त्रास कमी होतो. आल्याचे छोटे तुकडे करून पाण्यात टाकून उकळावे आणि ते पाणी प्यावं. हे कोमट पाणी प्यायल्यानं घशाला आराम मिळतो आणि खोकल्यापासून सुटका मिळते.
Menstrual period : कोमात असलेल्या महिलेला मासिक पाळी येते की नाही?
४. हळद
जीवाणूंच्या वाढीला प्रतिबंध करणारे घटक आणि विषाणूविरोधी गुणधर्म असल्यानं हळद उपयुक्त आहे.
सर्दीसोबतच खोकल्याची समस्या यामुळे दूर होते. एक चमचा हळद पावडरमध्ये चिमूटभर काळी मिरी
घालून कोमट दुधात मिसळून प्या. यामुळे खोकल्यापासून आराम मिळतो.
५. गरम सूप
घरी बनवलेलं गरम सूप खोकल्यापासून आराम देऊ शकतं. सुपामुळे खोकल्यापासून आणि सर्दीपासूनही आराम मिळतो. मिश्र भाज्यांचं सूपही यावर चांगला पर्याय आहे.
६. कोमट पाण्याच्या गुळण्या
कोमट पाण्यानं गुळण्या केल्यानं, खोकल्यामुळे होणारा त्रास आणि घसा खवखवणं कमी होतं. कोमट पाण्यात
थोडं मीठ टाकून गुळण्या केल्यानंही त्रास कमी होतो.