TRENDING:

मसाला चहा आणि तूप वाढलेली चरबी कमी करणार, कशी? जाणून घ्या

Last Updated:

तुपामुळे वजन वाढेल असा बहुतेकांचा समज असला तरी योग्य प्रमाणात तूप खाल्लं तर तुपामुळे वजन झपाट्याने कमी होऊ शकतं.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
तुपामुळे वजन वाढेल असा बहुतेकांचा समज असला तरी योग्य प्रमाणात तूप खाल्लं तर तुपामुळे वजन झपाट्याने कमी होऊ शकतं.
तुपामुळे वजन वाढेल असा बहुतेकांचा समज असला तरी योग्य प्रमाणात तूप खाल्लं तर तुपामुळे वजन झपाट्याने कमी होऊ शकतं.
advertisement

Ayurvedic Medicinal plants: आजार कोणतेही असो, घरात 4 रोपं लावाच, शरिरासाठी आहेत गुणकारी

शुद्ध तुपाचे अनेक फायदे आहेत, त्यातला एक महत्त्वाचा म्हणजे तुपामुळे वजन कमी करता येतं. तुपामध्ये वजन कमी करण्याची ताकद असते. काही लोक कोमट पाण्यात आणि ब्लॅक कॉफीमध्ये तूप मिसळून सेवन करतात, काही लोक कोमट पाणी आणि लिंबाचा रस मिसळून तूप खातात, तसंच मसाला चहासोबत तूप घेतल्याने पोटाची चरबी लवकर वितळते. तज्ज्ञांच्या मते, ही रेसिपी खूप प्रभावी आहे.

advertisement

Walking: दररोज किती मिनिटं चाललं पाहिजे? 30 दिवसांमध्ये जाणवले असा शरिरावर परिणाम

यासाठी सर्वप्रथम एका भांड्यात पाणी गरम करावे, यानंतर त्यात आले आणि लिंबाचा रस घाला. दालचिनी, लवंग, वेलची, जायफळ घाला, यानंतर थोडा वेळ उकळू द्या. हे झाल्यावर त्यात थोडे तूप आणि मध घाला. हा मसाला चहा आणि तूप यांचे मिश्रण पोटाची चरबी वितळण्यासाठी योग्य आहे.

advertisement

मसाला चहा आणि तूप चरबी कशी कमी करेल -

तुपात अ, ड, ई आणि के जीवनसत्त्वे असतात. याशिवाय यामध्ये ओमेगा ३ फॅटी ॲसिड असते. तूप पचनशक्ती मजबूत करण्यासाठी खूप चांगले मानले जाते. यासोबतच तुपामध्ये हेल्दी फॅट, प्रोटीन आणि अँटीऑक्सिडंट्स असतात. चयापचय क्रिया योग्य प्रकारे काम करत असेल तर तुमची पचनक्रिया नीट राहील, आणि योग्य पचनामुळे शरीराची संपूर्ण यंत्रणा ठीक राहील. तुपाचे सेवन केल्याने शरीरातील निरोगी कोलेस्टेरॉल वाढते आणि तुम्हाला दीर्घकाळ भूक लागत नाही. विशेषतः जेव्हा तुम्ही मसाले आणि कोमट पाण्यासोबत तूप सेवन करता तेव्हा त्याचे महत्त्व आणखी वाढते.

advertisement

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
मसाला चहा आणि तूप वाढलेली चरबी कमी करणार, कशी? जाणून घ्या
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल