TRENDING:

Monsoon Health Care : सावध व्हा! पावसाळ्यात दमट वातावरणामुळे वाढतोय त्वचेला इन्फेक्शनचा धोका; वेळीच करा योग्य उपाय

Last Updated:

Fungal Infection Treatment : पावसाळ्याच्या दिवसात जास्त ओलसर वातावरणामुळे फंगल इन्फेक्शन होण्याची शक्यता वाढते.यापासून बचावासाठी स्वच्छता अत्यंत गरजेची आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Skin Care Tips : पावसाळा किंवा दमट वातावरणामध्ये फंगल इन्फेक्शन म्हणजेच बुरशीजन्य संसर्ग होण्याची शक्यता वाढते. हे संसर्ग त्वचा, नखे, केस आणि काही वेळा शरीरातील इतर भागांवरही होऊ शकतो. फंगल इन्फेक्शन त्वचेवरील जळजळ,खाज,लालसर ठिपके निर्माण करू शकते.योग्य काळजी न घेतल्यास हा संसर्ग वाढू शकतो आणि दीर्घकाळ टिकू शकतो.
News18
News18
advertisement

फंगल इन्फेक्शनची कारणे कोणती?

बुरशीजन्य संसर्गामागे मुख्य कारण म्हणजे ओलसर आणि दमट वातावरण. पावसाळ्यात आपली त्वचा किंवा अंग ओले राहणे, घाम जास्त येणे आणि व्यवस्थित स्वच्छ न ठेवणे हे सर्व फंगल इन्फेक्शन होण्याची शक्यता वाढवते.तसेच जाड कापड, न धुतलेली मोजी वापरणे तसेच चपल किंवा शूज जी ओले राहतात या सर्वांमुळे बुरशी वाढते.

advertisement

लक्षणे कोणती?

1.त्वचेवर खाज, लालसर ठिपके

2.नखांमध्ये जळजळ किंवा पिवळी पडलेली नखे

3.अंगाच्या तळव्यांवर किंवा बोटांमध्ये पिवळी,जाड त्वचा किंवा फुटणे

4.केसांच्या मुळाजवळ खाज किंवा त्वचेवर लहान ठिपके

उपचार:

फंगल इन्फेक्शन झाल्यास तातडीने उपचार सुरू करणे महत्वाचे आहे. लघुकाळासाठी अँटीफंगल क्रीम, लोशन किंवा पावडरचा वापर होऊ शकतो. गंभीर प्रकरणांमध्ये डॉक्टरांनी दिलेल्या औषधांचा वापर करणे आवश्यक असते. त्वचेवर हात लावणे टाळा आणि संसर्गग्रस्त ठिकाण स्वच्छ ठेवा.

advertisement

बचावाचे उपाय:

1.ओले कपडे किंवा शूज वापरू नका. उष्ण व शुष्क वातावरणात राहा.

2.रोज स्नान करून त्वचा स्वच्छ ठेवा.

3.अंगाच्या तळव्यांचे आणि बोटांचे नीट कोरडे करणे गरजेचे आहे.

4.सार्वजनिक ठिकाणी, जसे की जिम, स्विमिंग पूल, सार्वजनिक शौचालय, पायाच्या संरक्षणासाठी चपला वापरा.

5. घट्ट कपडे घालणे टाळा.

(वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)

advertisement

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Monsoon Health Care : सावध व्हा! पावसाळ्यात दमट वातावरणामुळे वाढतोय त्वचेला इन्फेक्शनचा धोका; वेळीच करा योग्य उपाय
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल