TRENDING:

Cleaning Hacks : जॅकेट स्वच्छ करायचंय, पण धुण्यासाठी वेळ नाही? 'या' ट्रिक्सने काही मिनिटांत दिसेल नव्यासारखं

Last Updated:

Simple Jacket Cleaning Hacks : हे जॅकेट साफ करण्यासाठी तुम्ही काही ट्रिक्स वापरू शकता. ज्यामुळे ते लवकर स्वच्छ होईल आणि त्याला कोणताही वासदेखील येणार नाही. शिवाय यासाठी तुम्हाला जॅकेट घरी धुण्याची किंवा ड्रायक्लिनिंगला देण्याचीही गरज नाही.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
Choose
News18 on Google
advertisement
मुंबई : आपल्याकडचे जॅकेट किंवा कोट बऱ्यापैकी महागडे असतात. त्यामुळे ते वापरताना आणि वॉश करतं आपल्याला खूप काळजी घ्यावी लागते. हे जॅकेट धुणं एकत्र खूप अवघड आणि वेळखाऊ काम असतं. शिवाय जॅकेटच्या लेबलवर असलेल्या नियमानुसार ते धुवावं लागतं. अशावेळी जर तुम्हाला घाई आहे आणि जाकीट धुण्यासाठी वेळ नसेल तर?
ड्राय क्लीनिंगशिवाय जॅकेट कसे स्वच्छ करावे?
ड्राय क्लीनिंगशिवाय जॅकेट कसे स्वच्छ करावे?
advertisement

यावर एक उत्तम उपाय आहे. हे जॅकेट साफ करण्यासाठी तुम्ही काही ट्रिक्स वापरू शकता. ज्यामुळे ते लवकर स्वच्छ होईल आणि त्याला कोणताही वासदेखील येणार नाही. शिवाय यासाठी तुम्हाला जॅकेट घरी धुण्याची किंवा ड्रायक्लिनिंगला देण्याचीही गरज नाही. चला तर म्ह पाहूया घरच्या घरी जॅकेट कसं स्वच्छ करावं

या पद्धतीने स्वच्छ करा जॅकेट..

advertisement

- सर्वात आधी आपल्याला जॅकेटवरचे डाग ब्रशच्या साहाय्याने काढून टाका. जॅकेटवर कोणत्याही पदार्थाचा किंवा कशाचाही डाग असेल तर तर त्यावर हलक्या हाताने ब्रश फिरवून तो काढण्याचा प्रयत्न करा. याने काहीअंशी फरक पडेल.

- त्यानंतर जाकीट स्वच्छ करण्यासाठी एक लिक्विड बनवा. त्यामध्ये दोन ग्लास कोमट पाणी, थोडी साखर, बेकिंग सोडा आणि थोडे लिंबू घाला. आता त्यामध्ये एक कचवता रुमाल किंवा फेस टॉवेल बुडवा. हा रुमाल त्या लिक्विडमध्ये बुडवा आणि पिळून घ्या. आता हा रुमाल जॅकेटच्या डागांवर हलकेच दाबा. हलक्या हाताने डॅब-डॅब करा. याने थोड्या वेळाने डाग निघून जाईल.

advertisement

- यानंतर तुम्ही कोट किंवा जॅकेट उन्हाळात वळवू शकता किंवा तुम्ही त्याला हेअर ड्रायरनेदेखील वळवू शकता.

जॅकेट स्वच्छ करण्याच्या आणखी काही पद्धती..

- जॅकेटवर जर मेकअपचे डाग पडले असतील तर ते काढण्यासाठी तुम्हाला फेशियल क्लींजर घ्यावे लागेल. फेशियल क्लींजर कापसावर घेऊन त्याने मेकअप लागलेला भाग पुसा. याने जॅकेटवरचे मेकअपचे डाग सहज निघतील.

advertisement

- जॅकेटची दुर्गंधी दूर करण्यासाठी एका स्प्रे बॉटलमध्ये थोडा व्होडका आणि पाणी समान प्रमाणात मिसळा. ते जॅकेटवर थोडे थोडे स्प्रे करा आणि नंतर ते सुकू द्या. यामुळे तुमच्या जॅकेटच्या दुर्गंध पूर्ण नाहीसा होईल.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
मानलं गड्या! दूध शिल्लक राहिलं, पांडुरंगनं डोकं लावलं, आता 25 लाखांचा टर्नओव्हर
सर्व पहा

Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Cleaning Hacks : जॅकेट स्वच्छ करायचंय, पण धुण्यासाठी वेळ नाही? 'या' ट्रिक्सने काही मिनिटांत दिसेल नव्यासारखं
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल